Horoscope November 14 : या राशीसाठी खुल्या होणार नोकरीच्या नव्या संधी

कन्या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात. धनु राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. 

Updated: Nov 13, 2021, 10:15 PM IST
Horoscope November 14 : या राशीसाठी खुल्या होणार नोकरीच्या नव्या संधी title=
मुंबई: प्रत्येक राशीसाठी दिवस एकसारखा नसतो. कधी आनंद घेऊन येतो तर कधी संकटांचा डोंगर. रविवार 12 राशींसाठी कसा असणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना हे जाणून घेणार आहोत. रविवारी कर्क राशीच्या लोकांना नोकरीत यश मिळेल. 
 
कन्या राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार येऊ शकतात. धनु राशीच्या लोकांच्या व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. अॅस्ट्रो गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा चिराग दारूवाला यांच्याकडून जाणून घेऊया रविवारचा दिवस 12 राशींसाठी कसा असणार आहे. 
 
मेष: कामाच्या ठिकाणी दिवस चांगला असणार आहे. दिवसाची सुरुवात चांगली होईल. कामाच्या ठिकाणी अचानक बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होणार आहे. 
 
वृषभ: रविवारी आपलं मन प्रसन्न राहणार आहे. कुटुंबासोबत आपण वेळ घालवू शकता. तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण कराल. आपल्या कामात आज यश मिळणार आहे. 
 
मिथुन: हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क प्रस्थापित कराल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील.
 
कर्क: रविवारचा दिवस तुमचा उत्साहाचा जाणार आहे. नोकरीत यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. कौटुंबिक कलह संपुष्टात येतील. 
 
सिंह: कामात मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. आनंदी असणार आहात. शुभारंभात सहभागी होण्याचा आजचा योग आहे. 
 
कन्या: कठोर परिश्रम आपल्याला कामी येतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. कुटुंबासोबत आज प्रवासाचा योग आहे.
 
तुळ: आपलं भाग्य रविवारी जोरावर असणार आहे. कामाच्या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. चतुराईन समस्यांचा सामना करा. 
 
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी आपण अति उत्साही असाल. रविवार आपल्यासाठी वेगळा आनंद घेऊन येणार आहे. कामात यश मिळणार आहे. 
 
धनु: अडचणींपासून आपली रविवारी सुटका होणार आहे. आरोग्य चांगलं असणार आहे मात्र दुर्लक्ष करू नका. कुटुंबात प्रसन्न वातावरण असणार आहे. 
 
मकर: भाग्य आपल्य़ाला साथ देईल. कामात आपलं वर्चस्व राहणार आहे. आपल्याला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 
 
कुंभ: रविवार आपल्यासाठी खूप खास असणार आहे. चतुराईने काम केलं तर आपला फायदा होईल. नोकरीच्या ठिकाणी आपलं कौतुक होईल. 
 
मीन: आपला दिवस खूप चांगला असणार आहे. कठीण परिस्थितीचा न डगमगता सामना करावा लागणार आहे. उत्साहाने भरलेला दिवस असणार आहे.