Inauspicious Yog June 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह वेळोवेळी आपल्या ठरावीक वेळेनंतर आपली स्थिती बदलतात. ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात, त्यासोबत नक्षत्र गोचरही करतात. ग्रहांच्या या गोचरमुळे अनेक योग निर्माण होत असतात काही योग हे शुभ असतात तर काही अतिशय घातक असतात. जून महिन्याला सुरुवात झाला असून या महिन्यात वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार महाभारत काळातील धोकादायक योग निर्माण होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 5200 वर्षांनंतर हा योग निर्माण होतोय. महाभारत काळात या धोकादायक योग निर्माण झाला तेव्हा कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध झालं होतं. ज्यात असंख्य सैनिक, राजे आणि योद्धे यांचा मृत्यू झाला होता.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा धोकादायक योग 23 जून ते 5 जुलैपर्यंत असणार आहे. महाभारतात त्रयोदशी पक्षाच्या योगात कौरव आणि पांडवांमधील युद्धाच बिगुल वाजलं होतं. तीच वेळ आता जून 2024 मध्ये निर्माण होणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात साधारणपणे दोन पक्ष असून प्रत्येक पक्षात 15 दिवस असतात. मात्र पंचांगातील काही योग असं असतात ज्यामुळे हे दिवस कधी 14 किंवा 16 असतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून 2024 महिन्यात दोन पक्षात दोन तिथी कमी आहेत. त्यामुळे एका पक्षात 13 दिवस आणि दुसऱ्या पक्षात 17 दिवस असणार आहे. ज्योतिषांच्या गणनेनुसार त्रयोदशी पक्ष अत्यंत अशुभ मुहूर्त मानला गेला आहे. ज्योतिषांच्या मते, गुरु आणि शुक्र एकत्र येणे हे खूप मोठे कारण मानलं गेलं असून ज्योतिषांच्या मते 13 दिवसांचा पक्ष खूप विनाशकारी मानला जातो.
ज्योतिषांच्या मते, एका पक्षात 13 दिवसांचा अशुभ काळ महाभारत काळात निर्माण झाला होता. त्रयोदशी तिथीचा अशुभ योगात कौरव आणि पांडवांमध्ये युद्ध सुरू झालं होतं. पौराणिक कथेनुसार, पांडव आणि कौरवांच्या युद्धात असंख्य सैनिक आणि योद्धे मारले गेले होते. महाभारतासारखा अशुभ योग जून महिन्यातील 23 जून ते 05 जुलैपर्यंत असणार आहे. दरम्यान, या अशुभ योगाचा प्रभाव केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात पाहायला मिळणार आहे.
वैदिक ज्योतिषांनुसार त्रयोदशी पक्षाचा काळ विनाशकारी मानला गेला आहे. या संयोगाच्या निर्मितीमुळे जगात कुठेतरी वादळ, पूर, दुष्काळ यांसारखी संकटे येण्याची शक्यता वर्तविण्यात आलीय. या त्रयोदशी पक्षात सर्वांनी काळजी घ्यावी, असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञ सांगतात. या काळात देवाची उपासना करा आणि सकारात्मक ऊर्जा ठेवा असं ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांचा सल्ला आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)