Daridra and Khapper Yoga 2023: प्रत्येत ग्रह त्याच्या ठरलेल्या वेळानुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. दरम्यान ज्यावेळी ग्रह दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, त्यावेळी शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. यावेळी अधिकमास सुरू असून पंचांगातील श्रावण महिना 59 दिवसांचा असून तो 30 ऑगस्ट रोजी संपणार आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्टमध्ये सूर्य देव कर्क राशीत प्रवेश करणार आहे. दरम्यान यामुळे महा दरिद्र हा अशुभ योग तयार होणार आहे. त्याचबरोबर मलमासमध्येही खप्पर योग तयार होणार आहे. अनेक राशीच्या लोकांवर या दोन्ही योगांचा अशुभ प्रभाव पडणार आहे. जाणून घेऊया या काळात कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी.
ज्योतिष शास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांवर महा दरिद्र योग आणि खप्पर योग नकारात्मक प्रभाव देणार आहे. या दरम्यान, आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी. या काळात करिअरची चिंता वाढू शकते. नोकरीशी संबंधित अडचणी दिसतील. कामाच्या ठिकाणी थोडं सावध राहावं लागणार आहे. त्याचप्रमाणे जोडीदारासोबत मतभेद होण्याची अधिक शक्यता आहे. व्यापाऱ्यांना नफा कमी होण्याची अपेक्षा आहे.
खप्पर आणि महा दरिद्र योग तयार झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनावर विपरीत परिणाम होणार आहे. यावेळी आईच्या तब्येतीची चिंता राहील. तुमचं काम काळजीपूर्वक करा. एखाद्या आजारामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. कोणताही मोठा निर्णय घेणं टाळावं. अचानक आलेल्या त्रासामुळे तणाव निर्माण होऊ शकतो.
धनु राशीच्या लोकांसाठी महा दरिद्र योग आणि खप्पर योग अशुभ सिद्ध होणा आहेत. या स्थितीचा जोडीदाराच्या आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तसंच यावेळी रागाचा अतिरेक करणं टाळावं. कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळा. खर्चात वाढ झाल्यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागू शकतो. या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक टाळावी.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )