Mangal Ast 2023: ज्योतिष शास्त्रात, एका ठराविक वेळेनंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी मंगळ हा धैर्य, उर्जा आणि शौर्याचा कारक यांचा मानला जातो. इतर ग्रहांप्रमाणेच हा शुभ ग्रहही वेळोवेळी आपली हालचाल बदलतो. गोचरप्रमाणे मंगळ ग्रहाचा अस्त देखील होतो.
ग्रहांच्या उदय आणि अस्त परिस्थितीतचा राशींवर विशेष प्रभाव पडतो. मंगळ सध्या अस्त स्थितीत असून 11 जानेवारी 2024 पर्यंत याच स्थितीत राहणार आहे. मंगळाच्या अस्ताचा काही राशींच्या व्यक्तींवर विपरीत परिणाम होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
ज्योतिषीय गणनेनुसार, मंगळ 11 जानेवारी 2024 पर्यंत अस्त स्थितीत राहील, जो मेष राशीसाठी शुभ मानला जात नाही. या काळात आरोग्याशी संबंधित काही समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही वादांना सामोरे जावे लागू शकते. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये मतभेद होऊ शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी मंगळ ग्रहांची स्थिती लाभदायक ठरणार नाहीये. यावेळी तुमच्या जीवनात काही समस्या निर्माण होणार आहेत. या काळात खर्चात अचानक वाढ होईल. अनावश्यक खर्चामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. लव्ह लाईफमध्येही काही अडचणी येण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीच्या लोकांनी मंगळ ग्रहाच्या अस्त कालावधीत आर्थिक गुंतवणूक करणे टाळावे. तसंच आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या कामावर विशेष लक्ष द्यावे लागेल. वैवाहिक जीवनात जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टीकोनातून मंगळाचा अस्त शुभ मानता येत नाही.
मंगळ ग्रहाच्या अस्ताच्या कालावधीत पैशांची उधळपट्टी वाढलेली दिसून येऊ शकते. या काळात तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला भागीदारीच्या कामात सावध राहावे लागेल. नोकरदार लोकांनाही कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागणार आहे. जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे शत्रू तुम्हाला पराभूत करण्यासाठी नवीन मार्ग शोधतील.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )