Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली? अभ्यंगस्नानानंतर कारिटं का फोडतात?

Narak Chaturdashi 2024 : उठा उठा दिवाळी आली...नरक चतुर्दशीला दिवाळीची पहिली आंघोळ केली जाते. अभ्यंगस्नानानंतर कारिटं फोडण्याची परंपरा आहे. यामागे वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?

Updated: Oct 30, 2024, 04:52 PM IST
Narak Chaturdashi 2024 : नरक चतुर्दशीची सुरुवात कशी झाली? अभ्यंगस्नानानंतर कारिटं का फोडतात? title=

Narak Chaturdashi 2024 : अख्खा देश आनंद आणि उत्साहाने न्हावून निघाला आहे. दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसतोय. दिवाळीतील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे, नरक चतुर्दशी असून यादिवशी महाराष्ट्रात अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. असं म्हणतात अकाली मृत्यूपासून मुक्ती आणि आरोग्य रक्षणासाठी नरक चतुर्दशीला पूजा करण्यात येतं. घरातील मोठी मंडळी म्हणतात सूर्यादयापूर्वी आंघोळ केल्यास आपल्याला स्वर्गात जागा मिळते. जर कोणी आळशी व्यक्ती या दिवशी उशिरा उठला आणि त्यानंतर आंघोळ केली तर त्याला नरक मिळतं. 

नरक चतुर्दशीला सुर्योदयापूर्वीच अभ्यंगस्नान का करावे?

पुराणात अशी कथा आहे की, पूर्वकाली भौमासूर किंवा नरकासूर नांवाचा एक बलाढ्य असुर प्राग्ज्योतिषपुर येथे राज्य करीत होता. त्याने इंद्राचे छत्र, अदितीची कुंडले व अमरपर्वतावरील मणिपर्व नांवाचे स्थान हरण केले.
देव आणि मानवांना ते त्रास देऊ लागला. आपण अजिक्य व्हावे म्हणून त्याने आपल्या राजधानीच्या सभोवती पर्वतांचे व शस्त्रांचे कोट रचले. हा दुष्ट दैत्य स्त्रियांस पीडा देऊ लागला. त्याने जिंकून आणलेल्या सोळा सहस्र उपवर राजकन्यांना आपल्या तुरुंगात कोंडून ठेविले व त्यांच्याशी विवाह करण्याचा बेत केला.

अशी स्थिती प्राप्त होताच जिकडे तिकडे हाहाकार उडाला. श्रीकृष्णाला ही बातमी समजताच त्याने बरोबर सत्यभामेस घेऊन त्या असुराच्या गडावर हल्ला केला. नरकासुरास ठार करून सर्व राजकन्यांची मुक्तता केली व नरकासुराने देव इंद्र आणि इतरांपासून हरण केलेले धन ज्यांचे त्यांस परत दिले.

चतुर्दशीच्या दिवशी उपःकालाच्या सुमारास नरकासुरास ठार करून व त्याच्या रक्ताचा टिळा आपल्या कपाळास लावून घरी येताच नंदाने श्री कृष्णांना मंगल स्नान घातले.

 

हेसुद्धा वाचा - Diwali 2024 : लक्ष्मीपूजन नेमकं कधी, 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? महाराष्ट्रात कधी साजरी करायची दिवाळी? पाहा योग्य तिथी, पूजा विधी

 

स्त्रियांनी दिवे ओंवाळून आनंद व्यक्त केला. सर्व नगरी आनंदोत्सवात सामील झाली. या युद्धाचे स्मारक म्हणून नरकचतुर्दशीचा दिवस दिवाळीतील मुख्य दिवस बनला आहे.

असे म्हटले जाते की, नरकासुराने श्री कृष्णांकडे वर मागितला की, ज्या दिवशी माझा मृत्यू झाला. तो दिवस साजरा व्हावा. दिव्यांनी घर अंगण सजवून हा दिवस साजरा व्हावा. अशी इच्छा या राक्षसाने श्री कृष्णांकडे व्यक्त केली. तसेच, आजच्या दिवशी जो कोणी सुर्योदयापूर्वी स्नान करेल तो स्वर्गात जाईल, त्याच्या नशिबातील नरक यातना दूर होतील, असेही या नरकासुराने देवांकडे मागितले.

त्यावर तथास्तू म्हणत श्रीकृष्णांनी नरकासुराला हा वर दिला. त्यादिवसापासून पहाटे सुर्योदयापूर्वीच अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे.

अभ्यंगस्नानाची वेळ

अभ्यंगस्नानाची वेळ 31 ऑक्टोबर 2024 - सकाळी 05:28 ते 06:41 वाजेपर्यंत 

अभ्यंगस्नान कसं करावं?

दिवाळी सणातील अभ्यंगस्नानाला भारतीय संस्कृतीत विशेष महत्त्व आहे.  नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून ब्रह्म मुहूर्तावर अभ्यंगस्नान म्हणजे तेल, उटणं लावून स्नान करावं. अंघोळ केल्यानंतर 'कारेटं' अंगठयाने फोडण्याची प्रथा आहे. अभ्यंगस्नान झाल्यानंतर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घ्यावं. त्यानंतर देवाला नैवेद्य म्हणून फराळाचे पदार्थ दाखवावे. घरातील सर्व सदस्यांनीही अंघोळीनंतर फराळाच्या पदार्थाचं सेवन करावं.

अनेक ठिकाणी या दिवशी दिवाळी पहाटचा (Diwali Pahat 2024 Date) कार्यक्रम असतो. अनेक तरुण-तरुणी या सांस्कृतिक कार्यक्रमाला तयार होऊन जातात आणि  दिवाळीचा उत्साह साजरा करतात.

नरक चतुर्दशीला पायाने का फोडलं जातं कारिटं?

अभ्‍यंगस्‍नानापूर्वी कारिट नावाचं फळ फोडण्‍याची परंपरा महाराष्‍ट्रात अनेक ठिकाणी आजही पाळली जाते. ते फळ नरकासूर या राक्षसाचं प्रतिक मानलं गेलं आहे. या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्‍यंगस्‍नानापूर्वी घराबाहेर किंवा तुळशी वृदांवनाजवळ डाव्‍या पायाच्‍या अंगठ्याने कारिट ठेचलं जातं. अभ्‍यंगस्‍नानाच्‍या आधी कारिटं फोडून नरकासुराचा प्रतिकात्मक वध केला जातो.  रस जिभेला लावला जातो आणि 2 बिया डोक्याला लावले जाते. खरं तर, एका अर्थाने त्या रुपात आपल्या मनातील सारी कटुता, दुष्टतेचा नाश केला जातो.

दिवाळीत कारिटं फोडण्याचं वैज्ञानिक कारणं

आश्विन महिना म्हणजे हिवाळाला सुरुवात होते. थंडीमध्ये आपल्या शरीराचे तापमान योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी हे कडू फळं कारिटं चाखलं जातं. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)