Bhadrapad Pradosh Vrat 2023 : भाद्रपद महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आज असून हे अतिशय खास आहे. प्रदोष व्रत हे भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. जे व्रत बुधवारी येतं त्याला बुध प्रदोष व्रत असं म्हणतात. आजचं प्रदोष व्रत हे गणेशोत्सव काळात आल्यामुळे विशेष आहे. कारण पिता मात पुत्र यांची एकत्र पूजा होणार आहे. विशेष म्हणजे हिंदू धर्मानुसार बुधवार हा दिवस गणेशाचा जन्म वार असल्याने या व्रताला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे. (pradosh vrat 2023 bhadrapad budh pradosh vrat 2023 date puja time and Ganeshutsav )
आज व्रत आणि पूजा केल्यास भगवान शंकर पार्वतींसह गणेशाची विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. शास्त्रानुसार हे व्रत केल्यास सर्व कार्य सहज पूर्ण होतात. वैवाहिक जीवनातील अडचणी नाहीसा होतात. त्याशिवाय आर्थिक समस्या दूर होते.
पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 27 सप्टेंबर 2023 ला दुपारी 01:45 वाजता सुरू होणार असून रात्री 10:18 वाजेपर्यंत असणार आहे. हा भाद्रपदाचा शेवटचा प्रदोष व्रत आहे.
शिवपूजेची वेळ - संध्याकाळी 06:12 ते रात्री 08:36 वाजेपर्यंत
या दिवशी भगवान शंकर, माता पार्वती आणि गणेश यांची पूजा केल्यास संतती प्राप्त होते, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या व्रताचं पालन केल्यानं मुलांनाही फायदा होतो, असं म्हणतात. मुलांच्या बुद्धीचा विकास होऊन त्यांची तार्किक क्षमता वाढते असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. बुधवारी होणाऱ्या प्रदोष व्रताला सौम्यवर प्रदोष असंही म्हटलं जातं.
बुध प्रदोष व्रताच्या दिवशी संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडावे. असं केल्यामुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. शिवाय नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
या दिवशी घरामध्ये लहान त्रिशूळ खरेदी करा. या उपायामुळे घरातील सदस्यांवर भोलेनाथाची कृपा बरसते, असं म्हणतात.
बुद्ध प्रदोषाच्या दिवशी शिवलिंगावर 108 बेलची पाने अर्पण करा. असं केल्याने भगवान शंकराची कृपा राहते आणि कामातील सर्व अडथळे दूर होतात.
या दिवशी शिवमंदिरात जाऊन तुपाचा दिवा लावा. हे अतिशय शुभ मानले जाते. या उपायाचा अवलंब केल्यास व्यवसायात लाभ होतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)