Rangbhari Ekadashi 2023 : रंगभरी एकादशी कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शिव-गौरी पूजेची पद्धत

Rangbhari Ekadashi 2023 Date  : रंगभरी एकादशीचाही संबंध भगवान शिवाशी आहे. ही एकमेव एकादशी आहे ज्यामध्ये भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. असं मानलं जातं की या दिवशी भगवान शिव माता पार्वतीला गौण अर्पण करून परतले होते, त्या दिवशी त्यांच्या भक्तांनी त्यांच्यावर रंग चढवून त्यांचं स्वागत केलं होतं. तेव्हापासून हा ट्रेंड सुरू आहे ज्याला रंगभरी एकादशी म्हणतात.

Updated: Feb 20, 2023, 01:00 PM IST
Rangbhari Ekadashi 2023 :  रंगभरी एकादशी कधी असते? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि शिव-गौरी पूजेची पद्धत title=
rangbhari ekadashi 2023 date shubh mhurat puja vidhi shiv gauri importance Special red gulal in marathi

Rangbhari Ekadashi 2023 Importance in marathi : फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला रंगभरी एकादशी असं म्हणतात. या एकादशीला विशेष महत्त्वं आहे. कारण रंगभरी एकादशीला भगवान विष्णूसह शंकर भगवान आणि माता पार्वतीची पूजा (Shiv Gauri Pujan) केली जाते. ही एकमेव एकादशी आहे जेव्हा आपण शंकर आणि पार्वतीची पूजा अर्चा करतो. या एकादशीला कोणी अमलकी एकादशी तर कोणी आमला एकादशी तर अमलका एकादशी म्हणून पण औळखतात. चला जाणून घेऊया रंगभरी एकादशी कधी आहे आणि तिथी, पूजेचा मुहूर्त आणि तिचं भगवान शिवाशी असलेला संबंध. (rangbhari ekadashi 2023 date shubh mhurat puja vidhi shiv gauri importance Special  red gulal in marathi)

रंगभरी एकादशी 2023 कधी आहे? (Rangbhari Ekadashi 2023 Date)

हिंदू पंचागनुसार फाल्गुन माघ शुल्क पक्षाची एकादशी म्हणजे रंगभरी एकादशी ही 02 मार्च सकाळी 6.39 वाजता सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 03 मार्च शुक्रवारी 9.11 वाजेपर्यंत असणार आहे. उदयतिथीनुसार रंगभरी एकादशी 03 मार्च शुक्रवारी साजरी होणार आहे. 

रंगभरी एकादशीची पूजा पद्धत

रंगभरी एकादशीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर काशीमध्ये बाबा विश्वनाथांची पूजा केली जाते. या दिवशी खास करुन भोलेनाथाला लाल रंग आणि गुलाल अपर्ण करण्याची परंपरा आहे. रंगबऱी एकादशीला सकाळपासूनच सौभाग्य योग आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार झाला आहे. दोन्ही योगांमध्ये उपासनेचे उत्तम फळ मिळणार आहेत. 

रंगभरी एकादशीचे महत्त्वं  

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शिव म्हणजेच बाबा विश्वनाथ यांनी रंगभरी एकादशीच्या दिवशी माता पार्वतीला पहिल्यांदा काशीत आणलं होतं. त्यावेळी भक्तांनी त्यांचा स्वागतासाठी लाल गुलाल आणि गुलालाची उधळण केली होती. त्यामुळे रंगभरी एकादशीला लाल गुलाला विशेष महत्त्वं आहे.  या दिवशी बाबा विश्वनाथ आणि माता पार्वतीला संपूर्ण शहरात प्रदक्षिणा घातली जाते आणि लाल गुलाल आणि फुलांनी त्यांचं स्वागत केलं जातं. रंगभरी एकादशीला काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजेचे आयोजन होते. रंगभरी एकादशीच्या दिवसापासून वाराणसीमध्ये रंगांचा उत्सव सुरु होतो. तो सलग सहा दिवस हा उत्सव साजरा केला जातो.