Shadashtak Yog 2023 : शनी-मंगळाने बनवला षडाष्टक योग; 'या' राशींवर येणार आर्थिक संकट

Shani Mangal Shadashtak Yog 2023 : शनि-मंगळाच्या युतीने षडाष्टक योग तयार होणार आहे. तब्बल 30 वर्षांनंतर हा योग तयार  होतोय. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. 

Updated: May 21, 2023, 09:38 PM IST
Shadashtak Yog 2023 : शनी-मंगळाने बनवला षडाष्टक योग; 'या' राशींवर येणार आर्थिक संकट title=

Shani Mangal Shadashtak Yog 2023 : ज्योतिष्य शास्त्रामध्ये मंगळ आणि शनि हे एकमेकांचे शत्रू मानले जातात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर हे एकत्रित असेल तर त्यांना त्यांच्या आयुष्यात बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मंगळ आणि शनि संक्रांतीच्या वेळी असे अशुभ संबंध बनवतात. ज्योतिष शास्त्रात हा योग अत्यंत अशुभ मानला जातो. 

10 मे ते 30 जून या काळामध्ये हा अशुभ योग तयार झाला आहे. जो शनि-मंगळाचा षडाष्टक योग आहे. मुख्य म्हणजे तब्बल 30 वर्षांनंतर हा योग तयार झाल्याची माहिती आहे. दरम्यान हा योग काही राशींना धोकादायक ठरणार आहे. पाहुयात शनि आणि मंगळाच्या या संयोगातून कोणत्या राशीसाठी षडाष्टक योग तयार होणार आहे. शिवाय या राशींच्या व्यक्तींनी कोणती काळजी घेतली पाहिजे, हे देखील जाणून घेऊया.

कधी तयार होतो हा योग?

ज्योतिष शास्त्राप्रमाणे, कुंडलीमध्ये दोन ग्रह एकमेकांपासून सहाव्या आणि आठव्या भावात असतात तेव्हा षडाष्टक योग तयार होतो. हा षडाष्टक फार अशुभ योग मानला जातो. 

सिंह रास

शनि मंगळाच्या या षडाष्टक योगामुळे सिंह राशीच्या लोकांना खूप काळजी घेण्याची गरज आहे. हा काळ सध्या सुरु असून तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच या षडाष्टक योगाच्या निर्मितीमुळे तुम्हाला मानसिक तणावाचाही सामना करावा लागू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होणार नाहीये. सुधारलेले नातेसंबंध बिघडू शकतात. 

कर्क रास

शनि आणि मंगळाच्या या अशुभ योगामुळे कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक अडचणी येणार आहेत. यामध्ये तुमचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळामध्ये तुमच्या बोलण्यावर तुम्हाला संयम ठेवावा लागणार आहे. मालमत्तेशी संबंधित एखाद्या वादात तुम्ही अडकू शकता. यावेळी कोणत्याही ठिकाणी गुंतवणुक करताना तुम्हाला विचार करावा लागणार आहे. कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते.

धनु रास

धनु राशीच्या लोकांना षडाष्टक योगामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कदाचित या काळामध्ये कमाईपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. मानसिक तणाव जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात, याचा तुम्हाला त्रास होईल.

कुंभ रास

षडाष्टक योग तयार झाल्यामुळे कुंभ राशीच्या लोकांना कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. गाडी चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे, या काळात अपघात होण्याची शक्यता असते. तुमचा स्वभाव काहीसा रागीट होऊ शकतो. वैवाहिक जीवनात काही गैरसमज होऊ शकतात, मात्र ते टाळणं, फायदेशीर ठरणार आहे.