Shani Dev Vakri: वैदिक ज्योतिष्यशास्त्रामध्ये शनिदेवाला वय, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान या गोष्टींचा कारक मानलं गेलं आहे. सर्व ग्रहांमध्ये शनीदेवाची चाल फार हळू मानली जाते. सर्व ग्रहामध्ये राशी बदलावेळी शनी देवांना अधिक वेळ लागतो. म्हणूनच शनिदेवाच्या चालीतील बदलाला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे.
17 जून रोजी शनिदेव कुंभ राशीत वक्री झाले आहे. तर आता 29 ऑगस्ट रोजी शनी देव वक्री अवस्थेत प्रवास करणार आहेत. दरम्यान त्यांच्या वक्री स्थितीतील प्रवासमुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना यावेळी फायदा होणार आहे.
वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. शनिदेव तुमच्या संक्रमण कुंडलीतील कर्म भावात भ्रमण करत आहेत. यामुळे तुमच्या मनात ज्या काही इच्छा आहेत, त्या सर्व पूर्ण होण्यास मदत होणार आहे. या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. त्याचबरोबर धनाची प्राप्ती होईल. यासोबतच कामे पूर्ण होतील.
वक्री शनीचं भ्रमण मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून भाग्यस्थानात विराजमान आहेत. या काळात तुमच्या कुटुंबामध्ये असलेले वाद दूर होणार आहेत. तुमच्या वडिलांशी तुमचे नाते सुधारेल. यासोबतच जोडीदाराच्या प्रकृतीत सुधारणा होणार आहे. 29 ऑक्टोबरनंतर तुम्हाला मोठं यश मिळू शकतं. कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते.
शनिदेवाचे वक्री भ्रण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी शुभ आणि फलदायी ठरू शकणार आहे. शनिदेव तुमच्या राशीतून पंचम स्थानात संचार करत आहेत. यावेळी तुम्हाला कोर्ट केसेसमध्ये विजय मिळू शकतो. तुम्हाला मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. तसंच नशिबाची साथही मिळणार आहे. तुम्हाला अचनाक मोठा धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शनिदेव वक्री झाल्यानंतर कुंभ राशीत प्रवास करणं तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळणार आहे. तुम्हाला अपघाती पैसे मिळू शकतात. नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं. आर्थिक लाभ होण्याची चिन्ह आहेत.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )