Sheetala Ashtami 2023 Date in marathi : देशावर ट्रिपल व्हायरसचं संकट आलं आहे. H3N2 व्हायसरमुळे दोन जणाचा मृत्यू झाला आहे. H3N2 व्हायसरचा सगळ्यात (H3N2 Virus Maharashtra On High Alert ) जास्त धोका लहान मुलांना आहे. अशातच लहान मुलांच्या आरोग्यासाठी करण्यात येणारी शीतला अष्टमी कधी आहे. अष्टमी पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा विधी या सगळ्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. होळीपासून आठ दिवसांनी शीतला अष्टमी साजरी केली जाते. या दिवशी देवी मातेला शिळं आणि थंड अन्न नैवेद्य म्हणून दाखवलं जातं.
शीतला अष्टमी व्रताच्या तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. चैत्र कृष्ण पक्ष अष्टमीची सुरुवात 14 मार्चला रात्रीपासून सुरु होतेय. म्हणून 14 की 15 कधी हे व्रत करायचं असं भक्तांना प्रश्न पडला आहे. हिंदू धर्मात आणि शास्त्रात उदय तिथीला महत्त्व आहे. त्यानुसार 15 मार्च 2023 बुधवारी शीतला अष्टमीचं व्रत ठेवायचं आहे.
चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी सुरु होते : रात्री 8.22 (14 मार्च 2023)
चैत्र कृष्ण पक्ष अष्टमी समाप्ती तारीख : संध्याकाळी 6.45 (15 मार्च 2023)
शीतला अष्टमी व्रत तारीख - 15 मार्च 2023
शीतला अष्टमी व्रत पूजेची शुभ वेळ - सकाळी 6.30 ते संध्याकाळी 6.30 (15 मार्च 2023)
शीतला माता म्हणजे पार्वतीचं रुप...तिला स्वच्छता आणि आरोग्याची देवी म्हणून पण ओळखलं जातं. स्कंद पुराणात शीतला मातेच्या रुपाचं अनेक वर्णन मिळतात. हातात कलश, सूप, झाडू आणि कडुलिंबाची पानं असलेली आरोग्याची देवता...अशा या शीतला मातेची पूजा केल्यास सुख समृद्धीसह रोगराई आणि व्याधी दूर राहतात असा शास्त्रात विश्वास आहे. या अष्टमीला शीतला मातेला अनेक ठिकाणी शिळं अन्न प्रसाद म्हणून दिलं जातं.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)