मेष - रोजचे काम वेळेत पुर्ण करा. जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. एकापाठो पाठ काम येत राहतील. नव्या ओळखी होतील. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये बढतीची शक्यता आहे.
वृषभ - भावनांमध्ये उतार-चढाव आणि जीवन काही बदल अनुभवाल. जास्त विचार करू नका. अडचणी संपतील. कौटुंबीक नात्यांमध्ये सुधारणा होईल. स्वत:ची प्रतिमा सुधारण्याची संधी मिळेल. कौटुंबीक समस्यांवर लक्ष द्या. काही घरगुती प्रकरणांमध्ये जास्त वेळ जाईल.
मिथुन - अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामं पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची संधी मिळेल. वैयक्तिक संबंध अधिक चांगले होतील. व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे.
कर्क - अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फायदा होवू शकतो. अपूर्ण राहिलेले काम मार्गी लागतील. आज घेतलेले निर्णय दिर्घ काळापर्यंत फायदा होतील. व्यवसायिक प्रवास होण्याची शक्यता आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक जीवनसाथीच्या सल्ल्याने करावी.
सिंह - कोण्या एका व्यक्तीसोबत संबंध दृढ होतील. आत्मविश्वासने काम करा. कोणत्याही कामाचा हट्ट धरू नका. सवयींमध्ये सुधारणा करा. दिवस सामान्य राहिल. गुंतवणुकीचा फायदा होईल.
कन्या - वाहन खरेदी करण्याचा विचार मनात येऊ शकतो. घाईघाईत कोणतंही काम करु नका. आर्थिक बाबतीत चिंता करावी लागेल. नोकरी आणि व्यापाराच्या बाबतीत गुंतागुंत वाढेल. पोटाचे विकार उदभवतील.
तूळ - कामात व्यग्र असाल. कामाच्या ठिकाणी अतरांकडून सन्मान मिळेल. अपूर्ण कामं मार्गी लागतील. वेळ चांगला आहे. अविवाहितांसाठी चांगला काळ आहे. प्रवासयोग आहे.
वृश्चिक - नोकरी आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या दृष्टीने प्रयत्न कराल. साथीदारावर राग व्यक्त करु नका. कोणावरच भावना लादू नका.
धनू - आर्थिक चणचण संपेल. मिळकत आणि खर्च यांच्यात समतोल असेल. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. प्रयत्न करा, अडचणींवर तोडगा काढा.
मकर - पार वाढवण्याचा विचार करा, फायदा होईल. महागड्या वस्तूंची खरेदी करण्याचा प्रयत्न कराल. सावध राहा. थकवा जाणवेल.
कुंभ - आज तुम्हाला तुमचे महत्व कळेल. रोजची कामे वेळत पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. जबाबदारी पार पाडण्याचा दिवस आहे. नवीन ओळखी होण्याचे योग आहे. लोकांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. लोक आज तुमच्या प्रति सहानभूती दाखवतील.
मीन - आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. अचानक धनलाभ होईल. कामात उत्साह वाढेल. घर आणि आजुबाजुच्या गोष्टींचा निर्णय काळजीपूर्वक घ्याल. पैश्यांच्या मुद्द्यांवर थोडा विचार करा. अडकलेले पैसे मिळतील. उत्पन्न, खर्च व्यवहाराच्या विषयांवर जातीने लक्ष द्या.