Surya Gochar In Ashlesha Nakshatra: ज्योतिषशास्त्रात सूर्याचं नक्षत्र परिवर्तन महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे ग्रहांच्या गोचरासोबत नक्षत्रप्रवेश देखील परिणामकारक ठरतो. हिंदू पंचांगानुसार सूर्यदेव 3 ऑगस्टला बुधवारी आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. सूर्यदेव 20 जुलैपासून पुष्य नक्षात्रात असून उद्यापासून आश्लेषा नक्षत्रात असणार आहे. बुधवारी सकाळी 9 वाजून 38 मिनिटांनी आश्लेषा नक्षत्रात भ्रमण करेल. हे भ्रमण 17 ऑगस्टपर्यंत असणार आहे. या नक्षत्र परिवर्तनामुळे मेषपासून मीन राशींवर परिणाम होईल.
मेष- आश्लेषा नक्षत्रात सूर्य येणार असल्याने मेष राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. ज्योतिषांच्या मते मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप शुभ राहील. शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांनाही शुभ परिणाम मिळतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काम मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन- सूर्याचा हा बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ फळ देईल. या काळात आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नामध्ये भरभराटीचा योग आहेत. गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेले या काळात गुंतवणूक करू शकतात. व्यवसायात प्रगतीची शक्यता राहील.
सिंह- सिंह राशीच्या लोकांसाठी हा बदल फायदेशीर ठरेल. पूर्ण झोकून देऊन केलेल्या कामात यश मिळेल. करिअरमध्येही तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. पद आणि प्रतिष्ठा वाढेल.
तूळ- आश्लेषा नक्षत्रात सूर्याचे आगमन झाल्याने तूळ राशीच्या लोकांचे भाग्य वाढेल. तुम्हाला कोणतेही नवीन काम सुरू करायचे असेल तर सुरू करू शकता. तुम्हाला यश मिळेल. मालमत्ता आणि वाहनाचे सुख मिळण्याची शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)