Tukaram beej : तुळशीमाळ परिधान करण्याचे फायदे आणि नियम जाणून घ्या.

Tukaram Beej : याशिवाय ज्योतिष शास्त्रातही तुळशीच्या माळेचे विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीत असणारे बुद्ध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.

Updated: Mar 9, 2023, 03:05 PM IST
Tukaram beej : तुळशीमाळ परिधान करण्याचे फायदे आणि नियम जाणून घ्या. title=

Tukaram Beej : संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा महाबीज सोहळा मोठ्या भक्तिभावात साजरा केला जात आहे, वारकरी संप्रदायासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि मोठा असतो. (tukaram beej 2023)

वारकऱ्यांमध्ये तुळशीला अत्यंत महत्व आहे हे आपण जाणतो, तुळशीचं रोप आणि तुळशी माळेला प्रत्येक वारकरी जीवापाड जपतो आणि मानतो. शिवाय हिंदू धर्मात तुळशीला खूप पूजनीय मानलं गेलं आहे. तुळशीच्या रोपाची पूजा-अर्चना रोजच्या रोज केली जाते. तुळशीला अत्यंत पवित्र आणि सकारात्मक वनस्पती म्हणून हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. 

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला जितकं महत्व आहे तितकंच महत्व वारकरी संप्रदायात तुळशी माळेला आहे. जाणून घेऊया तुळशी  माळेचे  माहित नसेलले  फायदे . 

तुळशी माळ जपल्याने त्याचे खूप फायदे होतात. श्री कृष्ण भगवान, विठू माउलीला मानणारे भक्तजण गळ्यात तुळशीची माळ परिधान करतात.  असं म्हणतात , गळ्यात तुळशीची माळ घातल्यास मनाची शांती आणि अध्यात्मिक शुद्धता प्राप्त होते.  याशिवाय ज्योतिष शास्त्रातही तुळशीच्या माळेचे विशेष महत्व सांगण्यात आलं आहे. तुळशीची माळ धारण केल्याने कुंडलीत असणारे बुद्ध आणि गुरु हे दोन्ही ग्रह बलवान होतात.  तुळशी माळ गळ्यात धारण करण्याचे काही नियम आहेत त्यांच्याविषयी जाणून घेऊया. 

तुळशीची माळ गळ्यात घालण्याचे नियम

  • - तुळशीला शुद्ध मानलं जात पण गळ्यात धारण करण्याआधी माळेला गंगाजलाने शुद्ध करून घ्यावे. 
  • - तुळशीच्या माळेमुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा होते. 
  • - तुळशीची माळ गळ्यात घातल्यावर सात्विक भोजन घ्यावे, मांसाहार करू नये.  
  • -ं एकदा का तुळशी माळ गळ्यात घेतली कि मग कधीच काढू नये असं म्हटलं जात. 
  • - गळ्यात परिधान करायची आणि जपण्याची तुळशी माळ वेगवेगळी असायला हवी. 
  • - जपानंतर माळ कापडात गुंडाळून ठेवावी. 
  • - तुळशी माळेत 27 कमीत कमी आणि जास्तीत जास्त 108 मणी असायला हवेत.