3 राशींसाठी भाग्य बदलणारा ठरणार आठवडा, कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना

3 राशींसाठी भाग्य बदलणारा ठरणार आठवडा, जाणून घ्या तुमच्यासाठी कसा असणार आठवडा

Updated: Nov 14, 2021, 09:33 PM IST
3 राशींसाठी भाग्य बदलणारा ठरणार आठवडा, कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना title=

मुंबई: नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा 3 राशींचं भाग्य बदलणारा ठरू शकतो. शत्रूंवर विजय मिळवून देणारा असणार आहे. या आठवड्यात चांगली कमाई होऊ शकते. 12 राशींपैकी कोणत्या राशीसाठी हा आठवडा अडचणीचा असेल? कोणत्या राशीचं भाग्य उजळेल हे जाणून घेऊया,  5 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर 2021 या कालावधीत खगोल गुरू बेजान दारूवाला यांचा मुलगा खगोल मित्र चिराग दारूवाला यांच्याकडून. 

मेष: धार्मिक कार्यात सहभागी होण्याचा योग आहे. प्रवासाचा योग आहे. या आठवड्यात शत्रूंवर मात करण्यात आपल्याला यश मिळणार आहे. पार्टनरसोबत आपला वेळ खूप चांगला जाणार आहे. 

वृषभ: कामासंदर्भात नवीन योजना आपण आखाल. त्या यशस्वी करण्याच्या दिशेनं वाटचाल कराल. अधिकारी आणि व्यापाऱ्यांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. शत्रूंवर मात करण्यात आपल्याला यश मिळणार आहे. 

मिथुन: अशुभ परिस्थितीवर तुम्ही विजय मिळवणार आहात. शत्रूंना आपण कडवी टक्कर द्याल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. वातावरण आनंदी राहणार आहे. जमीन आणि घराशीसंबंधित कामात चांगला लाभ मिळेल. 

कर्क: या आठवड्यात तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. दान करण्याचा योग आहे. सरकारी कामात कोणताही अडथळा येणार नाही. या आठवड्यात तुम्हाला भाग्य साथ देणार आहे. 

सिंह: राजकारणातील लोकांपासून सावध राहा शक्य असेल तर दूरच राहा. मान-सन्मान मिळेल. आपल्याला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. 

कन्या:  राजकारणात आपल्याला यश मिळेल. सरकारी क्षेत्रातील कामं मार्गी लागतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. 

तुळ: हा आठवडा संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. आरोग्याच्या समस्या जाणवण्याची शक्यता आहे. व्यवहार करताना काळजी घ्या. 

वृश्चिक: या आठवड्यात आपली परिस्थिती एकूण खराब असणार आहे. मनसिक तणाव वाढणार आहे. 

धनु: या आठवड्यात व्यवसायात यश मिळणार नाही. उच्च पदावर असलेल्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील. कुटुंबात आनंद राहील. आपल्या सवयी बदलणे आवश्यक आहे. चांगली बातमी मिळाल्याने आनंदाचे वातावरण राहील.

मकर: पैसा चांगल्या कामावर खर्च होईल. आपल्याला कामाच्या ठिकाणी चांगलं सहकार्य मिळणार आहे. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. 

कुंभ: उद्योग-व्यवसायात वाढ होईल. आपल्या लोकांसोबत चांगला वेळ घालवला येईल. नवीन लोकांशी संवाद वाढेल आणि त्यांच्याशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित होईल.

मीन: कोर्टाच्या कामात यश मिळणार आहे. आपल्यासाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा असणार आहे.