मुंबई : प्रत्येक माणसाच्या आत एक विशिष्ट उर्जा असते. ज्याचा प्रभाव आजूबाजूच्या गोष्टींवरही होतो. अनेकदा दुसऱ्यांच्या वस्तूंचा प्रभावही आपल्या जीवनावर होतो. त्यामुळे दुसऱ्यांच्या वस्तूचा वापर कधीही करु नये.
पेन - अनेकदा आपण एखाद्या कामासाठी दुसऱ्याचे पोन मागून घेतो मात्र बऱ्याचदा ते देण्यास विसरतो. मात्र हे अनेकदा आर्थिक समस्या आणि अपमानाचे कारण ठरु शकते.
घड्याळ - मनगटी घड्याळ माणसाच्या जीवनावर सकारात्मक- नकारात्मक प्रभाव टाकत असते. यातच दुसऱ्याचे घड्याळ जर वापरत असाल तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या व्यक्तीच्या जीवनावर होतो.
अंथरुण - वास्तुशास्त्रानुसार दुसऱ्या व्यक्तीचे अंथरुण अथवा पलंगावर झोपणे अशुभ मानले जाते.
रुमाल - एखाद्या व्यक्तीचा रुमाल मागून घेतल्याने त्या दोन व्यक्तींमध्ये भांडणाचे कारण ठरु शकते. तसेच आर्थिक समस्याही निर्माण होऊ शकते.
कपडे - दुसऱ्यांचे कपडे कधीही चुकून वापरु नयेत. यामुळे त्या व्यक्तीच्या जीवनात समस्या येऊ शकतात.