एका बाजूला देश संकटात, दुसऱ्या बाजूला हा क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार....

वर्ल्ड कप खेळलेला हा स्टार क्रिकेटर दुसऱ्यांदा अडकणार लग्नबेडीत, कोण आहे तो? 

Updated: Aug 19, 2021, 10:09 PM IST
एका बाजूला देश संकटात, दुसऱ्या बाजूला हा क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार.... title=

मुंबई: क्रिकेटर्स फक्त खेळामुळे किंवा मैदानातील वादामुळे नाही तर आपल्या पर्सनल आयुष्यामुळेही बऱ्याचदा चर्चेचा विषय होत असतात. कधी आंतरधर्मिय विवाह तर कधी अजब गोष्टी केल्यानं क्रिकेटर्सची चर्चा होते. मात्र एका क्रिकेटरची चर्चा तर अफगाणिस्तानमध्ये घडत असलेल्या घडामोडीनंतर होत आहे. याचं कारण म्हणजे एका बाजूला देश संकटात असताना दुसऱ्या बाजूला हा क्रिकेटपटू दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. या क्रिकेटपटूनं दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला. तिथली सत्ता उलथवून आपलं सरकार स्थापन करण्यासाठी तालिबान सज्ज आहे. एकीकडे देशात एवढं मोठं संकट असताना क्रिकेटपटू मात्र गुडघ्याला बाशिंग बांधून लग्नासाठी तयार होत आहे. या क्रिकेटपटूला पहिल्या पत्नीपासून 5 मुलं आहेत. असं असतानाही दुसरी पत्नी हवी म्हणून तो लग्न करत असल्याची माहिती मिळाली आहे.  

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार असगर अफगाणने क्रिकेट विश्वात मोठं नाव कमवलं. पण त्याच सोबत तो पुन्हा एकदा त्याच्या दुसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. असगर लवकरच दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असगरचं आधी लग्न झालं आहे. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीपासून 5 मुलं आहेत. 

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात असगरने होणाऱ्या पत्नीशी साखरपुडा केला होता. याचं माहिती अफगाणिस्तानच्या एका पत्रकाराने ट्वीटरवरून दिली होती. दुसऱ्या विवाहासाठी त्याने शुभेच्छाही दिल्या होत्या. 

 

2019 मध्ये असगर अफगाणकडे पुन्हा एकदा अफगाणिस्तान टीमच्या कर्णधारपदाची धुरा सांभळण्याची जबाबदारी मिळाली. तो याआधी गेली अनेक वर्षे अफगाणिस्तानचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघाने अनेक वेळा विश्वचषक खेळला आहे.