हरारे : अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत आयर्लंडच्या टीमचा पाच विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबतच अफगाणिस्तान क्रिकेट टीमने वर्ल्डकप तिकीट मिळवलं आहे. इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानची टीम पात्र ठरली आहे.
आयर्लंडच्या टीमने ५० ओव्हर्समध्ये सात विकेट्स गमावत २०९ रन्स केल्या. आयर्लंडच्या टीने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या अफगाणिस्तानच्या टीमने हे आव्हान ४९.१ ओव्हर्समध्ये गाठलं. अफगाणिस्तानने ५ विकेट्स गमावत २१३ रन्स केले आणि विजय मिळवला.
या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये दोन टीम्स वर्ल्डकपसाठी पात्र ठरणार होत्या. वेस्ट इंडिजच्या टीमने सर्वात आधी तिकीट मिळवलं. त्यानंतर आता अफगाणिस्तानची टीम वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली आहे.
Afghanistan beat Ireland by 5 wickets to qualify for 2019 Cricket World Cup.
— ANI (@ANI) March 23, 2018
अफगाणिस्तानच्या या विजयात युवा लेग स्पिनर राशिद खान आणि मोहम्मद शहजाद यांनी मोलाची कामगिरी केली. राशिद खानने ४० रन्सवर तीन विकेट्स घेतले आणि ओपनर मोहम्मद शहजाद याने ५४ रन्सची शानदार खेळी खेळली.
अफगाणिस्तानच्या मोहम्मद शहजादने ५० चेंडूच्या बदल्यात ५४ धावांची खेळी केली. तर असगर स्टानिकझाई या फलंदाजाने २९ चेंडूंच्या बदल्यात केलेली ३९ धावांची नाबाद खेळीही निर्णायकी ठरली त्यामुळे आयर्लंडच्या टीमवर अफगाणिस्तानला विजय मिळवणे अत्यंत सोपे गेले.