भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) सध्या आपली पत्नी अनुष्कासह (Anushka Sharma) लंडनमध्ये आहे. टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराट कोहली व्हिक्ट्री परेडमध्ये सहभागी झाला होता. यानंतर त्याने थेट लंडन (London) गाठलं होतं. अनुष्का मुलाच्या जन्मापासूनच लंडनमध्ये आहे. यामुळे विराट कोहली आणि अनुष्का कायमचे लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता अनुष्का शर्माने लंडनमधील एक फोटो शेअर केला आहे. दोघेही युनियन चॅपलमध्ये कृष्णा दास यांच्या कीर्तनात सहभागी झाले होते. ‘रॉक स्टार ऑफ योग’ म्हणून ओळखले जाणारे, कृष्णा दास हे समकालीन संगीतासह पारंपारिक भारतीय मंत्रांचं मिश्रण करतात. विराट कोहली आणि अनुष्काने कीर्तनात सहभागी झाल्याचे फोटो, व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. याआधी दोघे इस्कॉन मंदिरात पोहोचले होते.
जेफ्री कागेल असं त्यांचं मूळ नाव आहे. 1960 च्या दशकात त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला होता. त्यांनी भारतात प्रवास केला आणि नीम करोली बाबांचे शिष्य बनले. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा नीम करोली बाबांचे भक्त आहेत. अनुष्काने आपल्या सोशल मीडियावर कीर्तनाचे फोटो शेअर केले असून त्यात कृष्णा दास यांना टॅग केलं आहे. विराट आणि अनुष्का यांनी गेल्या वर्षीही लंडनमध्ये कृष्णा दास यांच्या कीर्तनाला हजेरी लावली होती.
विराट कोहली टी-20 वर्ल्डकपनंतर लंडनमध्ये कुटुंबासह वेळ घालवत आहे. याआधीही लंडनमध्ये त्यांनी कृष्ण दास यांच्या कीर्तनाला हजेरी लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मरीन ड्राईव्हवर भारतीय संघाच्या विजय परेडमध्ये सहभागी झाल्यानंतर विराट कोहली लगेचच लंडनला रवाना झाला होता. 4 जुलै रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सत्कार समारंभही पार पडला होता. पण अनुष्का लंडनमध्ये असल्याने वर्ल्डकपच्या अंतिम सामन्याला उपस्थित नव्हती.
Virat Kohli & Anushka Sharma attended Krishna Das Ji's Kirtan event in London. pic.twitter.com/FqGDVS36V6
— Virat Kohli Fan Club (@Trend_VKohli) July 14, 2024
अनुष्का शर्मा सध्या तिच्या दोन मुलांसह वामिका आणि अकायसोबत लंडनमध्ये आहे. बार्बाडोसहून भारतात परतल्यानंतर विराट कोहलीही त्यांना भेटण्यासाठी लंडनला गेला आहे. 29 जूनला भारतीय संघाने टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दरम्यान विराट आणि अनुष्का साधं आयुष्य जगण्याच्या हेतूने कायमचे लंडनला स्थलांतरित होणार असल्याची चाहत्यांना शंका आहे.
अनुष्का आणि विराट अनेकदा लंडनमध्ये दिसल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. 2023 मध्ये विराटने त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून ब्रेक घेतला आणि अनुष्कासोबत लंडनमध्ये काही वेळ घालवला. एका व्हायरल फोटोमध्ये अनुष्का आणि विराट लंडनमधील एका रेस्तराँच्या बाहेर दिसले होते. अकायच्या जन्माची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी विराट वामिकासोबत लंडनमधील रेस्तराँमध्ये दिसला होता.
त्यामुळे अकायचा जन्म लंडनमध्ये झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. अनुष्का शर्माने तिच्या गरोदरपणाचे अनेक महिने प्रसिद्धीपासून दूर राहत लंडनमध्ये घालवले होते. अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी जन्मानंतर पाच दिवसांनी मुलगा झाल्याचं जाहीर केलं होतं. तोपर्यंत, चाहत्यांना अकायच्या जन्माबद्दल काहीच माहिती नव्हती. मुंबईत एखादा सेलिब्रेटी असताना ही बातमी लपून राहण्यासारखी नाही. रिपोर्ट्समध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, विराट कोहलीने भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतून वेळ काढत दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी इंग्लंडला गेला होता.
विराट आणि अनुष्का या दोघांनीही नेहमीच आपलं आयुष्य फार साधं असून सतत प्रसिद्धीझोतात राहणं आवडत नसल्याचं सांगितलं आहे. त्यांना त्यांच्या मुलांसोबत सर्वसामान्यांप्रमाणेच सर्व गोष्टी करत जगायचं आहे.
तसंच मे महिन्यात विराट म्हणाला होता की, "एकदा मी गेलो, की गेलो. तुम्हा मला बराच काळ पाहू शकणार नाही. त्यामुळे मी आहे तोपर्यंत मला खेळाला सर्वस्व द्यायचं आहे. हीच एकमेव गोष्टी मला पुढे जाण्यास मदत करत आहे".
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अनुष्का आणि विराट ब्रिटनमधील एका कंपनीचे संचालक आहेत. रिपोर्टनुसार, यूके सरकारच्या Find and Update company information service नुसार दोघे मॅजिक लॅम्पच्या तीन संचालकांमध्ये आहेत. ही एक व्यवस्थापन सल्लागार कंपनी आहे. कंपनीचा अधिकृत कार्यालयाचा पत्ता वेस्ट यॉर्कशायर, यूके येथे आहे.