Arjun Tendulkar out for zero : भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) चा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सध्या देशांतर्गत सुरु असलेल्या रणजी ट्रॉफी 2022-23 (ranji trophy) सत्रामध्ये त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. कर्नाटकविरूद्धच्या (Goa vs Karnataka) सामन्यामध्ये त्याने गोलंदाजीमध्ये चांगला खेळ केला मात्र बॅटने त्याला साजेशी कामगिरी करता आली नाही.
28 डिसेंबर रोजी गोवा विरूद्ध कर्नाटक यांच्या सामन्याचा तिसरा दिवस होता. गोवा आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यामध्ये कर्नाटकने 603 रन्स केले. यानंतर गोव्याची टीम फलंदाजीसाठी उतरली असता अर्जुनला मोठी खेळी करता आली नाही. गोव्याकडून सुयश प्रभुदेसाई सोडून एकाही खेळाडू चांगली कामगिरी करू शकला नाही. यावेळी सर्वांना अर्जुन तेंडुलकरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तो भोपळाही फोडू शकला नाही.
कर्नाटकविरूद्ध गोवा या सामन्यामध्ये मनीष पांडेची बॅट चांगलीच तळपली. त्याने पहिल्या डावात 208 रन्सची खेळी केली आणि टीमला 608 स्कोरपर्यंत पोहोचण्यास मदत केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना गोव्याच्या फलंदाजांची नाकीनऊ आली.
सुयश प्रभुदेसाईने 165 बॉल्सचा सामना करत 87 रन्स केले, तर सिद्धेश लाडने 63 रन्स केले. मात्र यावेळी दुसऱ्या एंडवरून विकेट पडत होता. यावेळी अर्जुन तेंडुलकर ८व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र यंदाच्या वेळी त्याला या संधीचं सोनं करता आलं नाही. पहिल्याच बॉलवर अर्जुन तेंडुलकर शरथच्या बॉलवर कॅच आऊट झाला.
सध्या गोवा विरूद्ध कर्नाटक यांच्यामध्ये रणजी ट्राफीतला सामना सुरु आहे. कर्नाटक विरूद्धच्या सामन्यामध्ये अर्जुनने 26.2 ओव्हरमध्ये केवळ 79 रन्स देऊन 2 विकेट्स काढले. यावेळी अर्जुनने फॉर्ममध्ये असलेला ओपनर समर्थ आणि शुभांग हेगडे यांना पव्हेलियनमध्ये पाठवलं.
2022 हे वर्ष अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) च्या करियरसाठी टर्निंग पॉईंट ठरणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या खेळाडूने चांगला खेळ दाखवला आहे. गोव्याकडून प्रथम श्रेणीत देखील त्याने उत्तम खेळ केला आहे. रणजी ट्रॉफी तसंच सैय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनच्या नावाची चांगली चर्चा होती.
गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.