एक चान्स तो बनता है यार! 'या' तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. 

Updated: May 23, 2022, 01:18 PM IST
एक चान्स तो बनता है यार! 'या' तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच title=

मुंबई : आयपीएल लीग हे भारतातलं युवा टॅलेंट जगासमोर येण्यासाठी सूरू करण्यात आलं होते. मात्र तसे काही होताना दिसत नाही. कारण यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. त्यामुळे या खेळाडूंची मोठी निराशा झाली आहे.  

हे आहेत तीन खेळाडू 
IPL च्या १५ व्या हंगामातील लीग सामने संपन्न झाले आहेत. चार संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत, तर 6 संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. या बाहेर पडलेल्या संघांमध्ये असे अनेक खेळाडू होते, ज्यांना एक तरी संधी मिळायला हवी होती. मात्र प्रत्येक संघ 14-14 सांमने खेळूनही या तीन युवा खेळाडूंना संधी मिळाली नाही आहे. यामध्ये अर्जुन तेंडुलकर, यश धुळ आणि राजवर्धन हंगरगेकर या तीन खेळाडूंची नावे आहेत.   
 
अर्जुन तेंडुलकर

 क्रिकेटचा देव म्हटल्या जाणार्‍या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) ,मुंबई इंडियन्सने  20 लाखांच्या मूळ किंमतीला विकत घेतले. आयपीएलमध्ये मुंबईचे सर्व गोलंदाज विकेटसाठी झगडत असताना देखील अर्जुन तेंडुलकर सारख्या युवा खेळाडूला संघात स्थान देण्यात आले नाही. नेटमध्येही तो चांगली गोलंदाजी करत होता. मुंबई इंडियन्सनेही त्याच्या गोलंदाजीचे अनेक व्हिडिओ देखील शेअर केले होते. 

यश धुल

भारताने यश धुलच्या (Yash Dhul) नेतृत्वाखाली अंडर-19 विश्वचषक जिंकला. अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर, तो प्रथम श्रेणी क्रिकेट खेळला आणि यशस्वीही झाला. मात्र आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने त्याला एकही संधी दिली नाही. संघात फलंदाजांची कमतरता भासत असताना यश धुल सारख्या फलंदाजाचा विचार केला जाऊ शकला असता. मात्र त्यालाही संपूर्ण आयपीएल बेंचवर काढावी लागली.  

राजवर्धन हंगरगेकर

भारताचा युवा ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहीले जाते तो म्हणजे, राजवर्धन हंगरगेकर. दीपक चहरच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्ज राजवर्धन हंगरगेकरला (Rajvardhan Hangargekar) संधी देईल, असे मानले जात होते. परंतू राजवर्धन हंगरगेकरला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. एकीकडे आयपीएलला युवा खेळाडूंना प्रोत्साहीत करणारी लीग म्हणून पाहिले जात असताना, युवा खेळाडूंनाच मैदानाच एकही संधी दिली जात नसल्याने किकेटप्रेमींची निराशा झाली आहे.