दुबई : आशिया कपच्या सुपर-४ मॅचमध्ये भारतानं बांगलादेशला 7 विकेटनं हरवलं आहे. बांगलादेशनं ठेवलेलं 174 रनचं लक्ष्य भारतानं 36.2 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून पूर्ण केलं. या विजयात कॅप्टन रोहित शर्मा आणि रविंद्र जडेजा यांच महत्वाच योगदानं राहिलं. जडेजाने 29 रन्स देऊन चार विकेट घेतले. यामध्ये शाकिब अल हसनचा विकेट देखील होता. शाकिबला आऊट करण्यासाठी धोनीने आपले जादुई अस्त्र वापरले. धोनी भलेली कप्तानी करत नसेल पण त्याच्यातून कॅप्टनसी हटवणं मुश्किल आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. मैदानात होणाऱ्या बारीकसारीक हालचालही तो तिक्ष्णपणे टीपतो आणि याचा समोरच्याला अंदाजही लागू देत नाही.
— Gentlemen's Game (@DRVcricket) September 21, 2018
दहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला शाकिबने स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या शिखर धवनच्या हातात कॅच दिली. पण हे काही अचानक झालं नाही. याआधीच्या सलग दोन्ही बॉलवर शाकिबने फोर लगावले होते. पहिला फोर त्याने कव्हर दिशेला खेळला. यानंतर ओव्हरचा तिसरा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवत पुन्हा बॉल बाऊंड्री पार केला होता. अशावेळी धोनी कॅप्टन रोहित जवळ जाऊन काहीतरी पुटपुटतो दिसला. त्यानंतर काही क्षणात चित्र बदललेलं दिसतं. धोनीचं ऐकून स्लिपमध्ये उभा असलेल्या शिखर शाकिबने फोर मारलेल्या स्क्वेअर लेगच्या ठिकाणी उभा राहतो.
अशावेळी धोनीचा इशारा समजून जडेजा पुन्हा तसाच बॉल टाकतो. यावेळेसही शाकिब तसाच बॉल मारायला जातो आणि कॅच देऊन फसतो. त्याने हवेत टोलावलेला बॉल स्क्वेअर लेगला पुन्हा जातो पण यावेळेस तिथे फिल्डर उभा असतो. जिथे धोनीच्या सल्ल्यावरून फिल्डर आधीच होता. अशाप्रकारे नाट्यमयरित्या शाकिबला 17 रन्सवरच पव्हेलियनमध्ये पाठवण्यात आलं. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मानं टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. भारतीय बॉलरनी रोहितचा हा निर्णय योग्य ठरवत बांगलादेशला सुरुवातीपासूनच धक्के दिले. ९व्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या मेहंदी हसनंने कर्णधार मशरफी मुर्तजाबरोबर पार्टनरशीप केली आणि बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रोहित शर्मानं नाबाद 83 तर दिनेश कार्तिकनं नाबाद 1 रन केले. एमएस धोनीला 33, शिखर धवनला 40 आणि अंबाती रायडूला 13 रन करता आले. बांगलादेशच्या मशरफी मुर्तजा, शाकिब अल हसन आणि रुबेल हुसेनला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.
तब्बल वर्षभरानंतर भारतीय वनडे टीममध्ये पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजानं शानदार कामगिरी केली. यामुळे बांगलादेशचा १७३ रनवर ऑल आऊट झाला. रवींद्र जडेजानं 10 ओव्हरमध्ये 29 रन देऊन सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारला 3 विकेट आणि जसप्रीत बुमराहला 3 विकेट मिळाल्या. बांगलादेशच्या मेहदी हसननं सर्वाधिक 42 रन केले.