मुंबई : बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला (Asia Cup 2022) येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होतेय. या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलंय. या स्पर्धेसाठी टीम इंडिया, बांगलादेश आणि पाकिस्ताने संघ जाहीर केला आहे. यानंतर आता अफगाणिस्तानने आशिय कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. मोहम्मद नबी (Mohammad Nabi) अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. (asia cup 2022 afghanistan cricket announced team squad samiullah shinwari comeback after 2 years)
टीममध्ये ऑलराऊंडर सामिउल्लाह शिनवारीचं (Samiullah Shinwari) तब्बल 2 वर्षांनी संघात कमबॅक झालंय. त्याला शराफुद्दीन अशरफच्या जागी संधी देण्यात आली आहे. तर अशरफचा राखीव म्हणून समावेश करण्यात आला आहे. याशिवाय 17 वर्षांच्या नूर अहमदलाही संधी देण्यात आली आहे.
शिनवारीने अखेरचा टी 20 सामना मार्च 2020 मध्ये खेळला होता. शिनवारीने आतापर्यंत 22.02 या एव्हरेजने 64 टी 20 सामन्यांमध्ये 1 हजार 13 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने 28 विकेट्सही घेतल्या आहेत.
या स्पर्धेसाठी संघांची ग्रुपमध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार अफगाणिस्तान ग्रुप बीमध्ये आहे. अफगाणिस्तान व्यतिरिक्त या ग्रुपमध्ये बांगलादेश आणि श्रीलंकेचा समावेश आहे
अफगाणिस्तान आशिया कपच्या मोहिमेची सुरुवात ही 27 ऑगस्टपासून करणार आहे. अफगाणिस्तानचा श्रीलंकेसोबत सामना होणार आहे. यानंतर 30 ऑगस्टला बांगलादेशसोबत सामना पार पडेल.
आशिया कपसाठी अफगानिस्तान टीम : मोहम्मद नबी (कॅप्टन), नाजीबुल्लाह जादरान, अजमतुल्लाह ओमरजई, अफसार जाजई, फजलहक फारूखी, फारिद अहमद मलिक, हसमतुल्लाह शाहिदी, हजरतुल्लाह जाजई, इब्राहिम जादरान, करीम जानत, मुजीब उर रहमान, नवीन उल हक, नाजीबुल्लाह जादरान, राहमानुल्लाह गुरबाज, नूर अहमद, सामिउल्लाह शिनवारी आणि राशिद खान.