MS Dhoni Har Ghar Tiranga: देश स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करत असून संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. भारत सरकारने 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहीम सुरु केली आहे. आजपासून 15 ऑगस्टपर्यंत ही मोहिम सुरु रहाणार आहे. सेलिब्रिटिंपासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येक जण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिरंगा DP ठेवत आहे. यात भारतीय क्रिकेटर्सही मागे नाहीत.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोणी (MS Dhoni) यानेही इंन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर आपला प्रोफाईल बदलला आहे.
MS Dhoni ने बदलला प्रोफाईल
महेंद्र सिंग धोणी सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह असतो. आता स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त देशभक्ती म्हणून धोणीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिरंगा ठेवला आहे. याबरोबरच त्याने 'मी खूप नशीबवान आहे की मी भारतीय आहे' असं वाक्य लिहिलं आहे. चाहत्यांकडून याला चांगलीच पसंती मिळतेय.
धोणीचे इंस्टाग्रामवर 39 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत, तर धोनी फक्त चार लोकांना फॉलो करतो.
MS Dhoni changes his Instagram DP for Independence Day. pic.twitter.com/Ucznok9OFg
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 12, 2022
भारताचा महान क्रिकेटर
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून एम एस धोणीची गणना होते. भारतीय संघाला तीन प्रमुख ICC ट्रॉफी जिंकून देणारा तो एकमेव कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या क्रिकेटच्या तीनही प्रकारात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 15 ऑगस्ट 2020 मध्ये धोणीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.
भारतीय सैन्यात लेफ्टनंट
महेंद्रसिंग धोनीला भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद रँक आहे. याशिवाय तो एक उत्कृष्ट पॅराट्रूपर देखील आहे.