BCCI टीम इंडियातील खेळाडूंवर मेहरबान, भरघोस पगारवाढ मिळणार

आता बीसीसीआय  (Bcci Central Contract) किमान 3 कोटींनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे.

Updated: Dec 15, 2022, 04:48 PM IST
BCCI टीम इंडियातील खेळाडूंवर मेहरबान, भरघोस पगारवाढ मिळणार title=

मुंबई : बीसीसीआय (Bcci) अवघ्या काही दिवसांनी सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (Bcci Central Contract) जाहीर करणार आहे. या वार्षिक करारामध्ये टीम इंडियाचे आजी-माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर बीसीसीआय मेहरबान असल्याचं समोर आलंय. या दोन्ही खेळाडूंना भरघोस पगारवाढ मिळणार (Indian Cricketers Salary Hike) असल्याची चिन्हं आहेत. या दोघांची तब्बल कोटींमध्ये पगारवाढ होऊ शकते. बीसीसीआयचा यासाठी प्लान सुरु आहे. बीसीसीआयचा 2022-23 या हंगामासाठी वार्षिक करारात 10 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयकडून या प्लानला हिरवा सिग्नल मिळाल्यास सिनीयर खेळाडूंसह नव्या युवा क्रिकेटरचाही फायदा होणार आहे. (bcci central contract may salary inceresed virat kohli and rohit sharma bcci plans annual salaray)

4 वर्षांपासून पगारवाढ नाही

बीसीसीआयने गेल्या 4 वर्षांपासून कोणत्याही खेळाडूंची पगारवाढ केलेली नाही. बीसीसीआयने करार आणि ग्रेडनुसार देण्यात येणाऱ्या रक्कमेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आता बीसीसीआय किमान 3 कोटींनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे. इनसाईड स्पोर्ट्सच्या रिपोर्टमध्ये बीसीसीआयच्या सूत्रांनुसार हे वृत्त देण्यात आलं आहे. 

10-20 टक्क्यांनी पगारवाढ

रिपोर्टनुसार, "पगारवाढीबाबत अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. गेल्या वेळेस रिटेनरशीप इंक्रीमेंट ही सीओएदरम्यान करण्यात आली होती. आम्हाला कोरोना काळातील नुकसानाचंही हिशोब द्यायचा आहे. यावेळेस आम्ही 10-20 टक्क्यांनी वाढ करण्याबाबत चर्चा करत आहोत. मात्र आतापर्यंत नक्की काहीच झालेलं नाही. एपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत (Apex Council Meeting) याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल", अशी माहिती बीसीसीआय अधिकाऱ्याने दिली आहे.

7 वरुन थेट 10 कोटी

खेळाडूंची अखेरची पगारवाढ ही 2017-18 या मोसमात झाली होती. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील समितीत सीओएने ए प्लस या श्रेणीची सुरुवात केली होती. या श्रेणीत तिन्ही फॉर्मेटमधील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय 5, 3 आणि 1 कोटी एकूण 4 श्रेणी तयार करण्यात आल्या. इंग्लंडचे खेळाडू वार्षिक करारानुसार भारतीय क्रिकेटपटूंच्या तुलनेत अधिक कमाई करतात. रिपोर्टनुसार, 7 कोटींच्या श्रेणीत 3 कोटींनी वाढ होऊन थेट 10 कोटी करण्याचा विचार आहे. याव्यतिरिक्त 5 कोटीची श्रेणी 7 कोटी, तर बी आणि  सी श्रेणीतील खेळाडूंना 5 आणि 3 कोटी रुपये मिळू शकतात.