मुंबई : बुमराहपेक्षाही घातक बॉलर टीम इंडियाकडे आहे. मात्र निवड समिती आणि रोहित शर्मा त्याच्याक़डे दुर्लक्ष करत आहेत. टीम इंडियामध्ये संधी न मिळाल्याने त्याचं बाहेर बसून बसून करिअर धोक्यात आलं आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी हा यॉर्कर मास्टर करतोय मात्र टीम इंडियाचे दरवाजे अजूनही त्याच्यासाठी उघडले नाहीत.
दुखापतीमुळे हा बॉलर टीममधून बाहेर झाला खरा मात्र त्यानंतर या बॉलरकडे दुर्लक्षच झालं. कृणाल पांड्याची हटके विकेट त्याने वाढदिवशी घेतली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. याआधी त्याने सरावा दरम्यान स्टंम्प देखील आपल्या बॉलिंगने तोडला होता.
बुमराहपेक्षाही खतरनाक बॉलिंग करूनही त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. टीम इंडियामधून बाहेर बसून बसून त्याचं करिअर धोक्यात आलं आहे. या खेळाडूचं नाव टी नटराजन असं आहे.
टी नटराजन बुमराह आणि मलिंगाएवढेच घातक यॉर्कर टाकतो. निवड समितीनं याला दूधातून माशी बाजूला काढावी तसं टीम इंडियातून वगळलं. मार्च 2021 ला इंग्लंड विरुद्ध तो शेवटचा सामना खेळला. त्यानंतर टी नटराजनला पुन्हा टीम इंडियामध्ये संधी देण्यात आली नाही.
टी नटराजननं 1 कसोटी सामना तर 4 टी 20 इंटरनॅशनल सामने आणि 2 वन डे सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये 3 विकेट्स तर टी 20 मध्ये 7 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. वन डेमध्ये त्याने 3 विकेट्स घेतल्या. गेल्यावर्षी दुखापतीमुळे त्याला आयपीएलचे दोनच सामने खेळायला मिळाले.