Bhojpuri Commentary In IPL 2023 : आयपीएलला सुरुवात झाली आहे. यावेळी ब्रॉडकास्टर्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) एक नवी कल्पना आणली आहे. यानुसार IPL भारतातील विविध राज्यांमध्ये नेण्यासाठी स्थानिक भाषेतील कॉमेंट्रीचा अवलंब केला गेलाय. यावेळी सामन्याची कॉमेंट्री इंग्रजी आणि हिंदीमध्ये असताना आता मराठी, तेलगु, कन्नड तसंच तेलगु या भाषांमध्येही कमेंट्री सुरु केली आहे. त्यानुसार आयपीएलची भोजपुरी कमेंट्री (Bhojpuri Commentary) चाहत्यांना फारच आवडलीये.
शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. यावेळी चाहत्यांनी पहिल्यांदाच भोजुपारीत कॉमेंट्रीचा आनंद लुटला. यावेळी केवळ स्थानिक चाहते नाही तर देशभरातील चाहत्यांवर या कॉमेंट्रीची जादू चालली आहे. दरम्यान या भोजपुरी कॉमेंट्रीची सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे.
भोजपुरीमधील मजेशीर कॉमेंट्री ऐकल्यानंतर यूजर्सने त्यांचे अनुभव सोशल मीडियावर शेअर केलेत. काही युजर्सना भोजपुरी कॉमेंट्री इतकी आवडलीये की, त्यांनी लाइव्ह मॅचदरम्यानचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो ट्विटरवर शेअर केलेत.
भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी भोजपुरीमध्ये कॉमेंट्री केली आहे. या वेळी कॉमेंट्रीमध्ये ते, "ई का हो, मुंह फोड़बा का...?" यासोबतच "जियs जवान जियs...लहि गईल-लहि गईल" आणि "अउर हई देखs धोनी के छक्का" अशा वाक्यांचा उल्लेख केलाय. दरम्यान चाहत्यांनीही याचा भरभरून आनंद घेतला आहे.
मुंह नैखें फोरे के #IPLonJioCinema #bhojpuri #Cricket #ipl #iplopeningceremony #Commentary pic.twitter.com/dUoxXQDxOk
— Ravi Prashant (@IamRaviprashant) March 31, 2023
Bhojpuri IPL commentary pic.twitter.com/kGMA5JxX0w
— Deepjyotichetry (@dsarcasm97) March 31, 2023
Anyone who’s watching IPL on Jio Cinema, put on Bhojpuri commentary you won’t regret pic.twitter.com/0V9mZYixIx
— shubham2.0 (@bhav_paaji) March 31, 2023
या सामन्यामध्ये गुजरात टायटन्सचा विजय झाला. गुजरातने चेन्नईवर 5 विकेट्सने विजय मिळवला होता. हा सिझनमधील चेन्नईचा हा पहिला पराभव होता. शुभमन गिलने तुफान खेळीने गुजरातकडे विजय खेचून आणला. गिलने 36 बॉल्समध्ये 63 रन्स केले. त्याच्या या खेळीमध्ये त्याने 6 फोर आणि तीन सिक्स लगावले होते.
या सामन्यामध्ये ऋतुराजने तुफान फटकेबाजी केली. ऋतुराजने 9 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने 50 बॉल्समध्ये 92 रन्स केले. त्याच्या या खेळीने चेन्नईला 178 रन्सचा स्कोर उभा करण्यात यश मिळालं.