Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालेली आहे. पहिला सामना हा यजमान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात खेळवण्यात आलेला होता, मात्र या सामन्यात 60 धावांनी पाकिस्तानचा पराभव झाला. ग्रुप स्टेजच्या पहिल्याच सामन्यात पदरी पराभव आल्याने सध्या पाकिस्तानचा संघ अडचणीत आलाय. न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात पाकिस्तानच्या दोन स्टार खेळाडूंमध्ये भर मैदानातच वाद झाल्याचे पाहायला मिळाले. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी न्यूझीलंडने जबरदस्त फलंदाजी करून पाकिस्तानला विजयासाठी 321 धावांचं आव्हान दिलं. टॉम लेथम (118) आणि विल यंग (107) यांनी शतकीय खेळी केली. न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या 260 धावांवर ऑल आऊट झाला.
न्यूझीलंड विरुद्ध संघाकडून टॉम लेथम फलंदाजी करण्यासाठी उतरला तेव्हा पाकिस्तानचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी ओव्हर टाकण्यासाठी आला. यावेळी त्याने लेथमसमोर चांगला बॉल टाकला परंतु बॉल बाउंड्री बाहेर गेला. यानंतर विकेटकिपर आणि कर्णधार असलेला मोहम्मद रिझवान आणि शाहीन आफ्रिदीमध्ये वाद झाला. शाहीनला आक्रमक हातवारे करत होता. मात्र, पाकिस्तानचा माजी कर्णधार एवढ्यावर गप्प बसला नाही आणि त्याने त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. दोघांमधील हा वाद कॅमेऱ्यात कैद झाला आणि सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
— Nihari Korma (NihariVsKorma) February 19, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ ए ग्रुपमध्ये आहेत. याशिवाय यात बांगलादेश आणि न्यूझीलंडचा सुद्धा समावेश आहे. प्रत्येक संघ ग्रुप सतेजमध्ये प्रत्येकी 3 सामने खेळतील. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 23 फेब्रुवारी रोजी दुबईत होणार आहे. दुपारी 2: 30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. हा सामना पाकिस्तानसाठी करो या मरो चा असणार असून जर पाकिस्तान भारताविरुद्धच्या सामन्यात पराभूत झाला तर ते टूर्नामेंटमधून बाहेर पडतील.