मुंबई : क्रिकेटच्या इतिहासामध्ये काही अशा घटना आहेत ज्यामुळं अनेकदा हा खेळच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. अनेकदा काही खेळाडूंची कृत्य यासाठी कारणीभूत ठरतात. सेक्स स्कँडलच्या वादातही काही खेळाडू अडकल्यामुळं त्यांच्या नावाभोवती वादाचं वलय पाहायला मिळालं होतं.
2015 मध्ये वेस्ट इंडिजचा खेळाडू क्रिस गेल याच्यावर गंभीर आरोप लावण्यात आले होते. एका मसाज थेरेपिस्टनं क्रिसवर टॉवेल काढत प्रायव्हेट पार्ट दाखवण्याचा आरोप केला होता. या प्रसंगी तिला रडू कोसळलं होतं.
न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार चेंजिंग रुममध्ये काहीतरी आणण्यासाठी गेलं असता तिच्यामागे क्रिस येऊन उभा राहिला होता. पण, पुढे गेलला या प्रकरणातून क्लीन चीट मिळाली होती.
इंग्लंडच्या संघाचा माजी कर्णधार केविन पीटरसनही अशाच काही कारणांमुळे चर्चेत होता. दक्षिण आफ्रिकन प्रेयसी वेनेसा निम्मो हिच्यासोबत तो बराच काळ रिलेशनशिपमध्ये होता.
एका मेसेजनं त्यानं हे नातं तोडलं होतं. ज्यानंतर तो फक्त शरीरसुखाचा भुकेला होता असा गंभीर आरोप तिनं लावला होता.
ऑस्ट्रेलियन खेळाडू शेन वॉर्न याचं नावही अशा प्रकरणामुळे चर्चेत आलं होतं. ब्रिटीश नर्स डोना राईटला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्यामुळं आणि काही मॉ़डेल्ससोबतचे फोटो व्हायरल झाल्यामुळे तो वादात अडकला होता.
पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा क्रिकेट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात संघातील काही खेळाडूंच्या साथीनं एका रुममध्ये मुलींसोबत दिसला होता.
पीसीबीनं या प्रकरणानंतर या खेळाडूंवर 2000 मधील चॅपियन्स ट्रॉफी खेळण्यावर बंदी घातली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या संघातील माजी खेळाडू हर्शल गिब्स यानं त्याच्या आत्मचरित्रपर पुस्तकामध्ये काही खासगी गोष्टींचा उलगडा केला होता.
ऑस्ट्रेलियाविरोधातील 1999च्या ग्रुप मॅचच्या आधीचा किस्सा सांगताना त्यानं लिहिलं, 'मला ठाऊक होतं की मी शतक ठोकणार आहे. बहुतेक माझ्या बाजुला बेडवर असणाऱ्या मुलीनंच मला प्रेरित केलं होतं.
तिनं हॉटेलमध्ये काम केलं होतं. तिथेच मी तिच्याशी मैत्री केली होती. मला वाटतं की ती माझा लकी चार्म होती.'