MS Dhoni Fan Cycle From Delhi To Ranchi To Meet Thala : टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्याला 5 वर्ष झाली आहेत. परंतु तरीही धोनीची फॅन फॉलोईंग कमी झालेली नाही. धोनीची एक झलक मिळण्यासाठी त्याचे फॅन्स गर्दी करतात. धोनीचा असाच एक जबरा फॅन त्याच्या थालाला भेटण्यासाठी 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून दिल्लीहून रांची येथे पोहोचला. तो जवळपास आठवडाभर धोनीच्या रांची येथील फार्म हाऊस बाहेर टेन्ट उभारून राहिला पण तरीही धोनी त्याला भेटलेला नाही. यावरून नेटकरी आता थेट धोनीला यावरून ट्रोल करत आहेत.
गौरव कुमार असं या फॅनचं नाव असून तो दिल्ली येथे राहणारा आहे. यापूर्वी सुद्धा धोनीला भेटण्यासाठी गौरव कुमार चेन्नई सुपरकिंग्सची मॅच दरम्यान रांची येथे आला होता. परंतु त्याला धोनीला भेटता आले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दिल्लीहून रांची येथे जवळपास 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून रांची येथे धोनीच्या आलिशान फार्म हाऊस बाहेर पोहोचला. तब्बल 7 दिवस तो धोनीच्या फार्म हाऊस बाहेर टेन्ट लावून राहत आहे परंतु अद्याप त्याला धोनी भेटलेला नाही. या दरम्यान दोनवेळा धोनी कार घेऊन घराबाहेर पडताना त्याला दिसला. धोनीने त्याला गाडीतून हात दाखवला पण त्याच्याकडे पाहिले नाही तसेच त्याला भेटण्यासाठी थांबलाही नाही.
हेही वाचा : टीम इंडियाला मोठा धक्का, न्यूझीलंड विरुद्ध सीरिजपूर्वी अनुभवी गोलंदाजाला दुखापत
धोनीचा फॅन असलेल्या गौरव कुमारने रांची येथे पोहोचल्यावर तो धोनीला भेटण्यासंदर्भातील अपडेट्स व्हिडीओद्वारे लोकांसोबत शेअर करत आहेत. त्याने धोनी कार घेऊन घराबाहेर पडत असतानाचे व्हिडीओ शेअर केले. तसेच यादिवसात तो टेन्टमध्ये राहत असल्याचेही व्हिडीओ द्वारे सांगितले. गौरव कुमारने त्याचे व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करून धोनी आणि त्याची पत्नी साक्षी याला टॅग करण्याचे आव्हान नेटकऱ्यांना केले.
यह स्थिति वाकई निराशाजनक है। प्रशंसकों की मेहनत और समर्पण का सम्मान होना चाहिए, खासकर जब वे किसी बड़े खिलाड़ी से मिलने के लिए इतनी दूर यात्रा करते हैं। अगर धोनी ने इस लड़के से मिलने का प्रयास नहीं किया, तो यह उनके फैंस के प्रति असंवेदनशीलता का संकेत हो सकता है।
खिलाड़ियों को… pic.twitter.com/4yVA5Ow3dD
— Ravi kumar Vyas (@ravi_congressi) October 1, 2024
मात्र आता यावरून लोक धोनीला ट्रोल करत आहेत. एक युजरने म्हंटले, " आता धोनीला हिरो म्हणणं बंद करा", जयकी यादव या यूजरने म्हंटले की, "अरे ओ धोनी धोनी म्हणणाऱ्यांनो आता तुमच्या धोनीचा खरा चेहरा बघा. अशा अहंकारी लोकांचे फॅन बनू नये, हे लोक PR द्वारे आपली प्रतिमा पॉलिश करतात तर प्रत्यक्षात ते खूप अहंकारी असतात".