क्रिकेटर शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली, चालू मॅच सोडून नेलं हॉस्पिटलला, नेमकं काय झालं?

Irani Cup 2024 : मुंबईकडून खेळताना सरफराज खानने पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 221 धावा ठोकून द्विशतक केले. परंतु मुंबईच्या टीमचं टेन्शन तेव्हा वाढलं जेव्हा चालू सामन्यात शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली. 

पुजा पवार | Updated: Oct 3, 2024, 12:54 PM IST
क्रिकेटर शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली, चालू मॅच सोडून नेलं हॉस्पिटलला, नेमकं काय झालं?    title=
(Photo Credit : Social Media)

Shardul Thakur Health Updates : लखनऊच्या एकना स्टेडियमवर इराणी कप 2024 चा सामना मुंबई विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात खेळवली जात आहे. 1 ऑक्टोबर पासून या इराणी कपला सुरुवात झाली असून यात अजिंक्य रहाणे हा मुंबई संघाचं नेतृत्व करतोय. यात मुंबईकडून खेळताना सरफराज खानने पहिल्या इनिंगमध्ये नाबाद 221 धावा ठोकून द्विशतक केले. परंतु मुंबईच्या टीमचं टेन्शन तेव्हा वाढलं जेव्हा चालू सामन्यात शार्दूल ठाकूरची तब्येत बिघडली. 

मराठमोळा क्रिकेटर शार्दूल ठाकूरची तब्येत सामना सुरु असताना अचानकपणे खराब झाली. त्यानंतर त्याला थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले. यावेळी शार्दूलची डेंग्यू आणि मलेरियाची टेस्ट करण्यात आली. याचा रिपोर्ट येणं अद्याप बाकी असून रिपोर्ट आल्यावर शार्दूल 3 ऑक्टोबरच्या सामन्यात खेळणार की नाही याचा निर्णय घेण्यात येईल. 

शार्दूलला मैदानात नेमकं काय झालं? 

शार्दूल ठाकूरने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या इनिंगमध्ये  59 बॉलवर 36  धावा केल्या. या दरम्यान त्यांने 4 चौकार आणि 1 षटकार लगावला. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला एका सूत्राने सांगितले की त्याला संपूर्ण दिवस चांगलं वाटतं नव्हतं. तो तीव्र ताप असतानाही खेळत होता, म्हणूनच तो उशीरा फलंदाजी करण्यासाठी आला. तो फलंदाजी करताना सुद्धा खूप कमजोर होता. सूत्रांच्या माहितीनुसार, 'शार्दूल औषध घेऊन ड्रेसिंग रूममध्ये झोपला होता. परंतु तब्येत ठीक नसताना सुद्धा त्याला फलंदाजी करायला जायचे होते. आम्ही त्याची डेंग्यू आणि मलेरियाची टेस्ट केली आहे. आता लवकरच टेस्टचा रिपोर्ट येईल. सामन्यानंतर तो हॉस्पिटलमध्येच पूर्ण रात्र राहिला'. सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास मुंबईने पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट्स गमावून 536 धावा केल्या. 

हेही वाचा : माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरुद्दीनला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED चं समन्स, काय आहे नेमकं प्रकरण?

 

शार्दूल ठाकूरची कारकीर्द : 

शार्दूल ठाकूर हा भारताचा 32 वर्षीय ऑल राउंडर क्रिकेटर आहे. त्याने भारताकडून टेस्ट क्रिकेट खेळताना 11 सामन्यात 331 धावा केल्या आणि 31 विकेट्स घेतले. वनडेत शार्दुलने 47 सामने खेळले ज्यात त्याने 329 धावा आणि 65 विकेट्स घेतले. तर 25 सामने खेळताना त्याने 69 धावा आणि 33 विकेट्स घेतले आहेत.