WTC Points Table: आयसीसी ट्रॉफी (ICC Trophy) जिंकण्याचं टीम इंडियाचं (Team India) स्वप्न 2023 मध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. यंदाच्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (ICC World Test Championship) फायनल सामना खेळवला जाणार आहे. ज्यासाठी टीम इंडियाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. शनिवारी म्हणजेच 11 फ्रेबुवारी रोजी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला आहे. या विजयासह टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये (WTC 2021-23 points table) स्थान अजूनच पक्क केलं आहे. याचसोबत भारताच्या विजयाने 3 टीम्सव WTC फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यामध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला पराभवाची चव चाखवली. 132 रन्स आणि एका डावाने विजय मिळवत भारताने सिरीजवर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टेस्ट मॅचचमध्ये पहिल्या डावात 177 तर दुसऱ्या डावामध्ये अवध्या 91 रन्सवर कांगारूंना ऑलआऊट करत सामना जिंकला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉईंट्स टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत फायनल रेससाठी प्रथम आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर भारताच्या परसेंटेज पॉइंट्समध्ये वाढ झाली आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे पॉईंट्स 58 होते तर आता विजयानंतर यामध्ये वाढ होऊन 61.67 झाले आहेत.
दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची टीम आता 70.83 पॉईंट्ससोबत पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे आता फायनल सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये खेळवला जाणार असल्याचं जवळपास निश्चित आहे. मात्र यावेळी गतविजेती न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांग्लादेश या टीमचं फायनल खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावातच संपुष्टात आला.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली. रवींद्र जडेजा, आर अश्विन यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरला. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.