'माहेरी गेलीस का?' घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान धनश्री वर्माने शेअर केला फोटो, नेटीझन्सनी सुरु केला प्रश्नांचा भडीमार

कोरिओग्राफर धनश्री वर्मा आणि क्रिकेटर युजवेंद्र चहल यांच्यातील घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. या दरम्यानच धनश्रीने शेअर केलेला फोटो काय संकेत देतो ते पाहा? सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 13, 2025, 10:25 AM IST
'माहेरी गेलीस का?' घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान धनश्री वर्माने शेअर केला फोटो, नेटीझन्सनी सुरु केला प्रश्नांचा भडीमार  title=

क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबतच्या घटस्फोटाच्या अफव्यांमुळे पुन्हा एकदा धनश्री वर्मा चर्चेत आली आहे. याचदरम्यान तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमुळे आता तिला नेटीझन्स थेट सवाल करत आहेत की, तू माहेरी निघून गेलीस की काय? 

धनश्रीने आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामधे ती आपल्या आईसोबत दिसत आहे. यावेळी धनश्रीच्या चेहऱ्यावर थोडी शांतता दिसत असल्याच म्हणत आहेत. तिने हा फोटो पोस्ट केला तेव्हा तिने कोणतीच कॅप्शन दिलेल नाही. यावरुन कळतंच की, तिच्या मनात किती नेमकं काय सुरु आहे. चाहते तिच्या मनातील भावना ओळखण्याचा प्रयत्न करत आहेत. 

सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanashree Verma (@dhanashree9)

धनश्रीची पोस्ट पाहून इंस्टा युझर्स वेगवेगळे कमेंट करत आहेत. तर काही जण तिच्या या परिस्थितीची खिल्ली उडवत आहे. एकाने लिहीलं आहे की, काकी, तुमच्या मुलीने फसवणूक केली आहे. एकाने लिहिलं आहे की, आता मी अनफॉलो करणार आहे. एका इंटरनेट युझरने लिहिले, व्हिक्टिम कार्ड. एकाने लिहिले, मिशन यशस्वी झाल्यानंतरचा आनंद. एकाने कमेंट केली, तू तुझ्या माहेरी गेलीस का?

अशी झाली दोघांची पहिली भेट 

धनश्री आणि युजवेंद्र चहलची प्रेमकहाणी कोविड दरम्यान सुरू झाली. धनश्री डान्स क्लास घेत होती. आणि युजवेंद्रने धनश्रीला नृत्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मेसेज केला होता. अशाप्रकारे त्यांची मैत्री सुरू झाली आणि अखेर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अलिकडेच, जेव्हा दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केल्याची बातमी आली, तेव्हा त्यांच्या घटस्फोटाच्या अफवा पसरू लागल्या. अद्याप कोणीही यावर कोणतीही पुष्टी दिलेली नाही.