मुंबई : २ वर्षाच्या बंदीनंतर पुन्हा खेळायला आलेल्य़ा चेन्नई टीमच्या अडचणी काही कमी होतांना दिसत नाही आहे. एका मागे एक अनेक झटके चेन्नईला लागत आहेत. पहिल्या सामन्यात केदार जाधव दुखापतीमुळे बाहेर झालाय त्यानंतर लगेचच रैना देखील दुखापतीमुळे बाहेर झाला. २ सामने चेन्नई आता रैनाच्य़ा अनुपस्थितीत खेळणार आहे. चेन्नईचा धडाकेबाज खेळाडू फॅप डुप्लेसिसच्या मांडीचे स्नायू दुखावलेत आणि त्याचं बोटही फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे तो आधीच संघातून बाहेर बसला आहे. त्यातच आता चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर लुंगी एनगिडी देखील टुर्नामेंट सोडून मायदेशी गेला आहे. वडिलांच्या अचानक निधनाने त्याला जावं लागलं आहे. काही दिवसांपूर्वीचं त्यांचं ऑपरेशन झालं होतं. पण त्यानंतर त्यांच्या निधनाची बातमी आली. त्यामुळे एनगिडी घरी गेला आहे.
चेन्नईमध्ये कावेरी पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे. त्यामुळे टी-२० स्पर्धेतील चेन्नईचे घरच्या मैदानावर होणारे सामने आता पुण्यात खेळवण्यात येत आहेत. दरम्यान, कावेरी पाणी प्रश्नावरुन मंगळवारी चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील सामनाही उशिरा सुरु झाला होता. यावेळी रविंद्र जाडेजा आणि फाफ ड्यू प्लेसिसवर मैदानात आंदोलनकर्त्यांनी बूटही फेकून मारला होता. त्यामुळेच आता चेन्नईचे सामाने इतरत्र ठिकाणी हलवण्यात आलेत. दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या चेन्नईला घरच्या मैदानावर क्रिकेटप्रेमींचा मोठा पाठिंबा मिळतो. मात्र, आता चेन्नईला हा सपोर्ट मिळणार नाही आहे.