RCB vs CSK, Faf du Plessis: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात रंगलेल्या सामन्यात चेन्नईने 8 रन्सने दमदार विजय मिळला आहे. या सामन्यात आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) पोटदुखीमुळे अस्वस्थ दिसून आला. फाफला वेदना होत असल्याचं पाहून फिजिओ ताबडतोब मैदानावर धावले. त्यानंतर त्यांनी फाफच्या पोटावर पट्टी बांधली. त्यानंतर देखील फाफने दमदार खेळी केली. फाफने 33 चेंडूत 187 च्या स्ट्राईक रेटने 62 धावा केल्या आहेत. या इंनिगमध्ये त्याने 5 दमदार फोर आणि 4 गगनचुंबी सिक्स देखील खेचले आहेत.
पोटावर पट्टी का बांधली? यावर फाफने सामना संपल्यानंतर उत्तर दिलं. फिल्डिंग करत असताना माझ्या बरगडीला दुखापत झाली होती, म्हणूनच पट्टी लावली होती, असं स्पष्टीकरण फाफने दिलं होतं. फाफला लागलं त्यावेळी त्याने शर्टवर केला. त्यावेळी त्याचा फिटनेस (Faf du Plessis Fitness) पाहून पोरी देखील लाजल्या. त्यावेळी फाफच्या डाव्या बाजूच्या बरगड्याजवळ उर्दू भाषेत एक शब्द लिहिला होता.
टॅटूची आवड असलेल्या फाफच्या अंगावर अनेक टॅटू (Faf du Plessis' Tattoo in Urdu) आहेत. चेन्नई विरुद्ध भरमैदानात त्याने शर्ट काय काढला, त्याच्या टॅटूची जोरदार चर्चा सुरू झाली. उर्दू भाषेत 'फज्ल' असं लिहिलं आहे. याचा अर्थ आशीर्वाद असा होतो. देवाच्या आशीर्वादीने मला सर्वकाही मिळालं आहे, असा याचा अर्थ होतो.
@faf1307 faf du plessis tattoo #FafDuPlessis @RCBTweets #RCBvsCSK pic.twitter.com/h4sltlonni
— Khan Yaseen (@Yaso__43) April 17, 2023
दरम्यान, डु प्लेसिस कधीही शर्ट काढण्याची संधी सोडत नाही, असं ब्रेंडन मॅक्युलम म्हणाला होता. मॅक्युलम आणि डु प्लेसिस हे दोघेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायचे. फाफला टॅटूचं खूप वेड आहे आणि तो खास क्षणी टॅटू गोंदवतो, असं मॅक्युलम म्हणाला होता. चेन्नई विरुद्ध आरसीबीला सामना जिंकता आला नसला तरी आरसीबीने नेहमीप्रमाणे सर्वांची मन जिंकली आहे. अस्सल क्रिकेटचा थरारक सामना दोन्ही संघात पहायला मिळाला होता.