नवी दिल्ली: क्रिकेटपटू गौतम गंभीर बऱ्याच काळापासून टीम इंडियामधून बाहेर आहे. तरीही वेगवेगळ्या कारणांवरुन चर्चेत असणारा गंभीर एका ट्वीटमूळे पुन्हा चर्चेत आला आहे.
'मला कोणत्यातरी घटनेत फसविले जात आहे.' असे ट्वविट त्याने केले. सुरूवातीला त्याने याचा खुलासा केला नाही . त्यामूळे हे प्रकरण नेमक काय आहे याबद्दल सगळीकडे चर्चा रंगली होती.
गंभीर आपल्या ट्विटमध्ये म्हणतो, मला तुमच्या मदतीची गरज आहे, मी लवकरच सविस्तर खुलासा करणार आहे.
त्याच्या ट्विटने चाहत्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.
I want to say it on record I am being framed. Need support big time. Will share details soon.
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 1, 2017
सध्या गौतम गंभीर आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार आहे. तो टीम इंडियामधून बराच काळ बाहेरही आहे.
गौतम गंभीर हा देश आणि जागतिक घडामोडींवर ट्विटरवर नेहमीच वैयक्तिक मत नोंदवत असतो. आपल्या या ट्विटनंतर जास्त काळ सस्पेन्स ठेवता आणखी दोन ट्वीट करत त्याने नव्या कॅम्पेनची माहिती दिली.
आपण फीवर एफएमद्वारा सुरू केलेल्या सीमा सुरक्षा दल कॅम्पेनमध्ये जोडलो असल्याचे त्याने सांगितले.
So here is d story. Am “Desh Framed”. @FeverFMOfficial latest campaign to mark #army flag day on December 7 #deshframe pic.twitter.com/Un2aMGXahd
— Gautam Gambhir (@GautamGambhir) December 1, 2017
यानंतर त्याच्या असंख्य चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. सर तुम्ही तर घाबरवून टाकलात, आम्ही तुम्हाला सपोर्ट करु. असे ट्वीट त्याच्या चाहत्यांनी केले.
पद्मावती प्रकरणातही गौतम गंभीरने ट्विटरवर आपले मत मांडले होते. तो म्हणतो, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ऑफ ब्युरोच्या माहितीनुसार, १९९५ ते २०१५पर्यंत तब्बल ३,२१,४२८ शेतकऱ्यांनी आणि शेतीशी संबंधित मजूरांनी आत्महत्या केली.
National Crime Records Bureau: From 1995 to 2015, about 321,428 farmers &agricultural labourers committed suicide. Wikipedia: about a lakh lives lost (civilians&forces combined) in Kashmir and we are debating release of ‘Padmavati’ on page 1-prime time news!!!
— Gautam Gambhir (@GautamGambhir) November 24, 2017
विकिपीडियानुसार काश्मीरमध्ये एक लाख सामान्य नागरिक आणि लष्कराच्या जवानांनी आपले प्राण गमावलेय.
मात्र प्राईम टाईमच्या पेजवर मोठी बातमी ही पद्मावती सिनेमाच्या रिलीज डेटवरुन सुरु असलेल्या वादाबाबत आहे.