Happy birthday Rohit sharma: प्रज्ञान ओझानं शेअर केला हिटमॅनचा फनी डान्स, व्हिडीओ

BCCI ने तर पुल शॉट मास्टर म्हणत रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Updated: Apr 30, 2021, 05:58 PM IST
Happy birthday Rohit sharma: प्रज्ञान ओझानं शेअर केला हिटमॅनचा फनी डान्स, व्हिडीओ title=

मुंबई: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्स टीमचा कर्णधार रोहित शर्माचा आज 34 वा वाढदिवस आहे. रोहितच्या पत्नीनं वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे वाढदिवसाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी देखील त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

BCCI ने तर पुल शॉट मास्टर म्हणत रोहित शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर तर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना अचानक रोहितच्या मजेशीर डान्सचा व्हिडीओ पोस्ट करत प्रज्ञान ओझानं वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स देखील आल्या आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pragyan Ojha (@pragyanojha)

प्रज्ञान ओझाने हॉटेल रूममधील रोहितच्या डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रोहित गाण्यावर मजेशीर पद्धतीनं डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत प्रज्ञाननं वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.

रोहित शर्माने जुलै 2007 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रोहितने टीम इंडियाकडून आतापर्यंत एकूण 38 कसोटी, 227 एकदिवसीय आणि 111 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

रोहित शर्माने तीनही स्वरूपात 2615, 9205 आणि 2864 धावा केल्या आहेत. रोहित जगातील एकमेव क्रिकेट खेळाडू आहे ज्याने टी -20 आंतरराष्ट्रीय मध्ये चार शतके ठोकली आहेत. याशिवाय वन डे आंतरराष्ट्रीय मध्ये तीन दुहेरी शतक ठोकणारा रोहित जगातील एकमेव खेळाडू आहे.