Hardik Pandya: रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात गुजरात टायटन्सने 6 रन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. सामन्यात एक वेळ अशी होती की, मुंबईचा विजय होणार असं स्पष्ट चित्र दिसत होतं. मात्र रोहित शर्मा आणि डेवाल्ड ब्रेविस यांना वगळता कोणत्याही फलंदाजाला उत्तम खेळ करता आला नाही. मुख्य म्हणजे, या सामन्यात हार्दिक पंड्याच्या एका चुकीमुळे मुंबईवर पराभवाची नामुष्की ओढावली असल्याचं म्हटलं जातंय.
श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात अखेर मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात टायटन्सने अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सवर 8 रन्सने विजय मिळवला. जिंकण्यासाठी मुंबईला 6 बॉल्समध्ये 19 रन्सची गरज होती. अखेरची ओव्हर उमेश यादवला सोपवण्यात आली. यावेळी पहिल्या बॉलवर पांड्याने सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर फोर लगावला. मात्र त्यानंतर पांड्या आणि पियुष चावला बाद झाल्याने गुजरातचा विजय झाला. या विजयामुळे मुंबईची पहिला सामना गमावण्याची पंरपरा कायम राहिली आहे.
मुळात हार्दिक पांड्याच्या एका चुकीमुळे मुंबई इंडियन्सला पराभवाला सामोरं जावं लागलं. झालं असं की, डेवाल्ड ब्रेविस 16व्या ओव्हरमध्ये बाद झाल्यानंतर हार्दिकने टीम डेव्हिडला फलंदाजीसाठी पाठवलं. यानंतर, 17 व्या ओव्हरमध्ये, तो रशीद खानसारख्या अनुभवी फिरकी गोलंदाजाविरुद्ध रन्स काढण्यासाठी संघर्ष करताना दिसला. यावेळी तो दबावाखाली आला होता, ज्यामुळे टीम डेव्हिडने 18 व्या ओव्हरमध्ये विकेट गमावली. यावेळी हार्दिक पंड्याने स्वतः फलंदाजीला उतरणं अपेक्षित होतं.
सामन्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला की, 42 रन्सचा पाठलाग करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला मात्र एका ठिकाणी आम्ही लय गमावली. तिलकचा रशीदविरुद्ध एकही न घेण्यामागे त्याचा काहीतरी विचार असेल. मी त्याच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो. काही हरकत नाही, आम्हाला अजून 13 सामने खेळायचे आहेत.
अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्धच्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. टॉसच्या वेळी बोलताना हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) गुजरातच्या चाहत्यांचे आभार मानले. मात्र, टॉसवेळी हार्दिक पांड्याला प्रेक्षकांच्या नाराजीला सामोरं जावं लागलं. रवी शास्त्री यांनी हार्दिक पांड्याचं नाव घेताच प्रेक्षकांनी पांड्याला डिवचल्याचं दिसून आलं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.