मुंबई : हसीन आणि मोहंमद शमीने लव्ह मॅरेज केलं आहे, त्यांची पहिली ओळख ही २०१२ मध्ये आयपीएलच्या सामन्या दरम्यान झाली. असं म्हणतात की शमीला पहिल्याचं नजरेत हसीन आवडली होती.
अनेक दिवस एकमेकांनी डेटिंग केली, यानंतर शमी आणि हसीनचं लग्न मुरादाबाद दिल्ली रोडवरील फाईव्ह स्टार हॉ़टेलमध्ये पार पडलं. या विवाहात निवडक लोकांना बोलावण्यात आलं होतं.
हसीनच्या बाबतीत असं सांगण्यात येतंय की, तिने डिग्रीपर्यंतच शिक्षण केलं आहे, तिचे पिता मोहम्मद हसन कोलकाताचे प्रसिद्ध ट्रान्सपोर्टर आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार, हसीन लहानपणापासून मॉडलिंग करू इच्छीत होती. हसीनने अनेक दिवस मॉडेलिंग केली. ती कोलकाता नाईट रायडर्सची चीअर लीडर देखील होती.
जेव्हा हसीन चीअर लीडर होती, तेव्हा तिची ओळख शमी सोबत झाली, पण लग्नानंतर शमीने आपलं करिअर सोडून ती घरात रमली. हसीनला अनेक वेळा फॉरेन टूरवर पाहण्यात आलं आहे. दोघांना एक चार वर्षाची मुलगी देखील आहे.
टीम इंडियाचा वेगवान बॉलर मोहमद शमीची बायको हसीनने शमीवर कथित आरोप लावले आहेत की, पाकिस्तानातील एक महिलेसोबत त्याचे एक्स्ट्रा मॅरेटल अफेअर आहे. तसेच त्यांच्यावर डोमेस्टिक वायलेन्सचाही आरोप लावण्यात आला आहे.
हसीनने या संबंधित एक पोस्ट फेसबुकवर देखील केली आहे. ज्यात व्हॉटसअॅप स्क्रीन शॉटस शेअर करण्यात आले आहेत. यातील स्क्रीन शॉटस हे शमीने इतर मुलींशी केलेल्या चॅटशी संबंधित आहेत.
शमीवर बायकोने आरोप केले आहेत की, तो इतर मुलीशी चॅट करतो, अंतरंग होण्यासंबंधीचे, हसीनने हे देखील आरोप केले आहेत की दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर शमीने आपल्याला मारहाण केली आहे. मोहंमद शमीने त्याच्यावर केलेल्या आरोपांचं ट्वीटरवर उत्तर दिलं आहे.