मुंबई : आयसीसीने टी 20 रँकिग (Icc T20I Ranking) जाहीर केली आहे. आयसीसीच्या गेल्या रँकिंगमध्ये टीम इंडियाच्या सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) दुसऱ्या क्रमांकावर मोठी झेप घेतली होती. त्यामुळे अव्वल स्थानी असूनही पाकिस्तानच्या बाबर आझमचं (Babar Azam) स्थान धोक्यातं होतं. या दोघांमध्ये अवघ्या काही रेटिंग्स पॉइंट्सचा अंतर होतं. त्यामुळे सूर्यकुमार बाबरला खाली खेचेल, अशी आशा होती. मात्र आयसीसीच्या या ताज्या क्रमवारीत बाबरने अव्वल स्थान कायम राखलंय. तर सूर्याही दुसऱ्या क्रमांकावर आहे. (icc t20i ranking pakistan captain babar azam again number 1 team india suryakumar yadav missed chance)
सूर्यकुमारमुळेच बाबरला पहिल स्थान अबाधित ठेवण्यात मदत झालीय. सूर्यकुमारला विंडिज विरुद्धच्या पाचव्या टी 20 सामन्यात विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे बाबरचं सिंहासन कायम राहिलं. तर सूर्याची नंबर 1 होण्याची संधी हुकली.
सूर्याला स्थान कायम असलं तरीही त्याला रेटिंग्स पॉइंट्समध्ये फटका बसलाय. सूर्यकुमार आणि बाबर यांच्यात 13 रेटिंग्स पॉइंट्सचा फरक आहे. बाबरचे 818 आणि सूर्याचे 805 पॉइंट्स आहेत.
सूर्याचे विंडिज विरुद्धच्या चौथ्या टी 20 मॅचनंतर 816 रेटिंग्स पॉइंट्स होते. त्यामुळे सूर्या आता बाबरला मागे टाकेलच, असं क्रिकेट वर्तुळात म्हटलं जात होतं. मात्र आता सूर्याची अव्वल स्थानाची संधीही हुकली आणि रेटिंग्स पॉइंट्सही 805 झाले आहेत.
In the form of his life
Sikandar Raza makes strides in the @MRFWorldwide ODI all-rounders rankings
— ICC (@ICC) August 10, 2022