मुंबई : आयसीसीने अवघ्या काही दिवसांपूर्वी टी 20 वर्ल्ड 2021 (T 20I World Cup 2021) कपसाठी एकूण 12 संघाची 2 ग्रृपमध्ये विभागणी केली. यामध्ये टीम इंडिया (Team India) आणि पाकिस्तान (Pakistan) हे पारंपरिक प्रतिस्पर्धी एकाच ग्रृपमध्ये आहेत. यामुळे क्रिकेट चाहत्यांना साखळी फेरीत अनेक वर्षांनंतर हाय व्होल्टेजचा थरार अनुभवायला मिळणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान टीम इंडियाचा पराभव करेल, अशी भविष्यवाणी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) केली आहे. (icc t20i world cup 2021 pakistan will be beat team india in final says shoaib akhtar)
शोएब काय म्हणाला?
या टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान हे दोन्ही संघ आमनेसामने असतील. मात्र या सामन्यात पाकिस्तान विजयी ठरेल. पाकिस्तानला यूएईमधील परिस्थिती अनुकूल आहे. या परिस्थितीचा फायदा पाकिस्तानला होईल. या दोन्ही संघातील सामना पाहायला मजा येईल. पण पाकिस्तान टीम वर्ल्ड चॅम्पियन ठरेल, असंही अख्तर म्हणाला. तो स्पोर्ट्स तकसोबत बोलत होता. दरम्यान पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत टीम इंडियाचा पराभव करता आलेला नाही.
टी 20 वर्ल्ड कपमधील उभयसंघांची कामगिरी
दोन्ही संघ टी 20 वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 5 वेळा आमनसामने भिडले आहेत. या 5 ही वेळेस टीम इंडिया पाकिस्तावर वरचढ राहिली आहे. भारताने पाकिस्तानचा पाचही सामन्यात पराभव केला होता. टी 20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना हे दोन्ही 14 सप्टेंबर 2007 ला भिडले होते. हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर बॉल आऊट द्वारे सामना निकाली काढण्यात आला. या बॉलआऊटमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं.
अखेरचा सामना कधी?
दोन्ही संघ अखेरीस टी 20 वर्ल्ड कपमध्ये 19 मार्च 2016 मध्ये आमनेसामने आले होते. या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानला 6 विकेट्सने पराभूत केलं होतं.
17 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात
ICC T20 World Cup ला 17 ऑक्टोबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. तर अंतिम सामना 16 नोव्हेंबरला खेळवण्यात येणार आहे. दरम्यान याबाबत आयसीसीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.