मुंबई : KL Rahul भारतीय क्रिकेट संघासाठी उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावत आहे. वर्ल्ड कप दरम्यान, भारतीय सलामीवीराने स्कॉटलंडविरुद्ध स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतकही पुर्ण केलं आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या खराब कामगिरीनंतर भारत स्पर्धेतून बाहेर पडला, मात्र राहुलचा सातत्यपूर्ण फॉर्म संघासाठी आश्वासक आहे.
राहुल त्याच्या खेळाव्यतिरिक्त त्याची गर्लफ्रेंड अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीसोबतच्या नात्याबद्दलही सध्या चांगलाच चर्चेत आहे. दोघांना ही गाड्यांची फार आवड आहे. त्यामुळे राहुल आणि अथियाकडे मोठं कार कलेक्शन आहे .
केएल राहुलला या गाड्यांची आवड
केएल राहुलसाठी, त्याच्या बहुतेक गाड्या वेगवान, मजबूत आणि शक्तिशाली आहेत. मर्सिडीज C43 AMG सेडान ही KL राहुलची पहिली महागडी कार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कारची किंमत जवळपास 75 लाख रुपये आहे, ज्यामध्ये 3.0-लीटर V6 इंजिन आहे. अगदी अलीकडे, क्रिकेटरने KLR नंबर प्लेट असलेली BMW SUV सोबत पोज दिली.
अथिया शेट्टीच्या गाड्यांचं कलेक्शन
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टीकडे महागडी वाहन्यांचं कलेक्शन आहे. अथिया मर्सिडीज बेंझ एस-क्लास आणि बीएमडब्ल्यू एक्स 5 या गाड्या चालवताना दिसली आहे.
तिच्या चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान, अथिया शेट्टी फोर्ड इकोस्पोर्टमध्ये पोहोचली, जी तिची वैयक्तिक कार आहे.
केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या ही बातम्या सध्या जोर धरत आहेत. नुकतीच केएल राहुलने अथियासोबतचा फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
त्यामुळे केएल राहुलच्या या फेवरेट गाड्यांमधून लवकरच त्याची गर्लफ्रेंड अथिया शेट्टी लाँग ड्राईव्हवर जाताना दिसेल.