चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला. भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना चेन्नईतील चेपॉक मैदानात सुरू आहे.
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माने चेपॉक मैदानावर इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी केली. संघाचा कोलमडणारा डाव त्यानं अगदी यशस्वीरित्या तारला आणि भारताला मजबूत स्थानावर आणलं.
टीम इंडियाचा स्टार खेळाडू हिटमॅन रोहित शर्माने शानदार फलंदाजी करत संघाला स्कोअर बोर्डवर पुढे नेलं. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे रोहित शर्मादेखील कसोटी सामन्यांमध्ये आपल्या हिटमन शैलीमध्ये दिसला. रोहित शर्माने 130 चेंडूमध्ये शतक पूर्ण केले. दरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार लगावले. रोहितच्या कसोटी कारकीर्दीचे हे 7 वे शतक आहे. त्यानंतरही त्याची बॅट थांबली नाही आणि त्याने 208 चेंडूत 150 धावा पूर्ण केल्या.
ICYMI - When Rohit got hearts racing in his 90s
Some nerves and tense moments on field & in the crowd as @ImRo45 looked eager to get to his 100. The batsman got there eventually not before providing some heart-racing moments.
WATCH https://t.co/cxA5CaMCfW #INDvENG @Paytm pic.twitter.com/sCXYK0WFcK
— BCCI (@BCCI) February 13, 2021
Ritika Sharma should be declared as national Lucky Charm pic.twitter.com/8Cf33Zzesp
— Nite!sh Singh (@Niteish_14) February 13, 2021
या सगळ्यात सध्या चर्चा आहे ती रोहितच्या लकी चार्मची. आश्चर्य वाटेल मात्र या लकी चार्ममुळे रोहितची बॅट आज तुफान फिरल्याची चर्चा मात्र सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. एकीकडे भारत विरुद्ध इंग्लंड सामना रंगात आला तर दुसरीकडे सोशल मीडियावर या चर्चांनी पेव फुटल्याचं पाहायला मिळालं.
रोहित फलंदाजी करत असताना त्याची पत्नी रितिका सजदेह रोहितच्या षटकार आणि चौकरांवर खूप गोड प्रतिक्रिया दिली आहे. इतकच नाही तर हिटमॅन रोहित शतकापासून काही धावा दूर असताना पत्नीनं प्रार्थना केल्याचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शतकापूर्वीची भीती आणि शतकानंतरचा आनंद या फोटोंमध्ये अगदी प्रकर्षानं दिसत आहे.
सोशल मीडियावर रोहित शर्माची पत्नी त्याच्यासाठी लकी चार्म असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या आहेत. आतापर्यंत भारताचे 6 गडी बाद झाले असून 284 धावा भारतीय संघाला काढण्यात यश आलं आहे. रिषभ पंत आणि अक्षर पटेल क्रिजवर आहेत.