भारत-इंग्लड क्रिकेट मॅच महाराष्ट्रात होणार की नाही ? मुख्यमंत्री काय म्हणताय ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेटबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

Updated: Feb 27, 2021, 07:18 PM IST
भारत-इंग्लड क्रिकेट मॅच महाराष्ट्रात होणार की नाही ? मुख्यमंत्री काय म्हणताय ... title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सामने महाराष्ट्रात खेळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे. मात्र राज्यातील वाढत्या कोरोनाचा विचार करून प्रेक्षकांना या सामन्यांसाठी उपस्थिती दर्शवता येणार नाही. भारत विरुद्ध इंग्लंड तीन वन डे सामने महाराष्ट्र खेळवले जाणार आहेत. प्रेक्षक-क्रिकेटप्रेमींना मात्र हे सामने पाहण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. 

प्रेक्षकांविनाच हे सामने खेळवले जातील. भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सामने महाराष्ट्रात खेळवायला मुख्यमंत्र्यांची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मिलिंद नार्वेकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. हे सामने विनाप्रेक्षक होणार आहेत. 

भारत विरुद्ध इंग्लंड इंटरनॅशनल वन डे मॅचेस महाराष्ट्रात खेळायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विकास काकटकर आणि मुंबई क्रिकेट संघटनेचे गव्हर्निंग काउन्सीलचे अध्यक्ष मिलिंद नार्वेकर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. 

यावेळी भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने महाराष्ट्रात खेळवण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आली. महाराष्ट्रात सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता, सर्व सामने विना प्रेक्षक खेळवायला मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे. राज्यात कोरोनाचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. तर खेळाडू आणि मैदानात विशेष काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सध्या भारत विरुद्ध इंग्लंड अहमदाबाद इथे 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना अद्याप बाकी आहे. हा सामना 4 मार्चला खेळवला जाणार आहे.