Rohit Sharma reveals retirement plan in Marathi : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका भारताने 4-1 ने जिंकली. धर्मशाला येथे झालेल्या पाचव्या सामन्यात भारताने एक धाव आणि 64 धावांनी विजय मिळवला या मलिकेत भारतचा कर्णधार रोहित शर्माने चांगली कामगिरी केली असून त्याने या मालिकेत दोन शतके झळकावली आहे. सध्या क्रिकेट विश्वात निवृत्तीचे सत्र सुरु आहे. अशातच आता हिटमॅन क्रिकेट विश्वातून कधी निवृत्त होणार अशी चर्चा रंगली. मात्र यावर रोहित शर्माने स्वत: ती स्पष्ट भूमिका मांडली.
क्रिकेट विश्वात 35 शी ओलांडली की निवृत्तीची चर्चा होते. असंच काहीस रोहित शर्माच्या बाबतीत सुरु आहे. रोहित शर्मा 30 एप्रिल 2024 रोजी 37 वर्षांचा होणार आहे. या वयात रोहित शर्माचा फॉर्म कायम आहे. त्यामुळे 2024 च्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी नेतृत्वाची धुरा सोपावली आहे.
दरम्यान टीम इंडियाने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात स्पर्धेत सलग 10 सामने जिंकल्यानंतर टीम इंडियाला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर रोहित जवळपास दोन महिने क्रिकेटपासून दूर राहिला होता. त्यामुळे प्रत्येकजण त्याच्या निवृत्तीचा अंगाज लावू लागला होता. मात्र आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्व सामने खेळले आणि संघाला 4-1 ने विजय मिळवून दिला. धर्मशालामध्ये मालिका जिंकल्यानंतर आणि पाचव्या कसोटीत विजयाची नोंद केल्यानंतर रोहित शर्माने निवृत्तीच्या प्रश्नावर आपले मौन सोडले आहे. यावेळी रोहित शर्माने मॅच जिंकल्यानंकर जिओ सिनेमावर निवृत्तीबाबत वक्तव्य केले. त्यावेळी त्याच्यासोबत झहीर खानही उपस्थित होता. यावेळी रोहितने स्वत: हा कधी निवृत्त होणार हे ही सांगितले.
निवृत्ती घेण्याच्या प्रश्नावर वर रोहित शर्मा म्हणाला की, “जेव्हा एक दिवस मी झोपेतून जागा होईल आणि मला स्वतःला वाटेल की मी आता खेळण्यास योग्य नाही. त्याच दिवशी मी क्रिकेटमधून निवृत्ती घेईन. पण गेल्या दोन-तीन वर्षात मी माझ्या खेळात सुधारणा केली आहे, असे मला वाटते.”
Rohit Sharma said, "if one day I wake up and feel I'm not good enough, I'll step away from cricket. I feel I've bettered my game in the last 2-3 years". (JioCinema). pic.twitter.com/uffoKocu2v
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 9, 2024
धर्मशाला कसोटी कर्णधार रोहित शर्माने शानदार शतक झळकावले. त्याने 162 चेंडू, 13 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 103 धावा केल्या. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील रोहित शर्माचे हे 9वे शतक आहे. तर या यादीत इंग्लंडचा जो रुट पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 52 सामन्यात 13 शतके झळकावली आहेत. आणि दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लॅबुशेन आहे, ज्याने 11 शतके झळकावली आहेत. यानंतर न्यूझीलंडचा केन विल्यमसन तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या हाताखाली 10 शतके आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथच्या नावावर 9 शतके आहेत. स्मिथनंतर रोहित शर्माने स्थान मिळवले आहे. स्टीव्ह स्मिथने 45 सामन्यांमध्ये 9 शतके ठोकली आहेत, तर रोहितने 32 सामन्यात 9 शतके झळकावली आहेत.