मुंबई : भारतीय क्रिकेट टीमने वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका जिंकलीये. टीम इंडियाने तिसरी वनडे 119 रन्सने जिंकून मालिका 3-0 ने जिंकली. या सामन्यात शानदार फलंदाजीनंतर टीम इंडियाची गोलंदाजीही उत्कृष्ट होती. भारताकडून युझवेंद्र चहलने 4, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराजने 2 तर अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णाने 1-1 विकेट्स घेतल्या.
डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने या सामन्यात विंडीजचा पराभव केला. 257 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव 26 ओव्हरमध्ये 137 रन्सवर गारद झाला. विंडीजकडून निकोलस पूरन आणि ब्रँडन किंग यांनी 42-42 रन्सची खेळी केली.
टी इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलचं पहिलं शतक पुन्हा एकदा हुकलं. टीम इंडियाच्या डावाच्या 36व्या ओव्हरमध्ये पाऊस आला आणि खेळाडूंना मैदान सोडावं लागले. त्यावेळी गिल 98 धावांवर नाबाद होता आणि अखेरीस तो त्याच धावसंख्येवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजला विजयासाठी 35 ओव्हरमध्ये 257 रन्सचं लक्ष्य देण्यात आले आहे.
तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान पावसाने खेळ केला. यामुळे सामन्याच्या ओव्हरमध्ये कपात करण्यात आली. यावेळी 35-35 ओव्हरचा सामना खेळवण्यात आला.