Ind vs Ban : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून नाईलाजानं बाहेर पडला आहे. परिणामी बांग्लादेशविरोधातील (Ind vs Ban ODI) एकदिवसीय मालिकेत त्याला खेळता येणार नाही. रविवारी होणाऱ्या क्रिकेट सामन्यासाठी शमी शारीरिकदृष्ट्या (Fitness) तयार नसल्यामुळं त्याला संघाबाहेर बसावं लागणार आहे. (Australia) ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच पार पडलेल्या टी20 वर्ल्ड (T20 World Cup) कपदरम्यान सराव सुरु असताना तो दुखापतग्रस्त झाला होता.
India's pacer Mohammed Shami has reportedly been ruled out of the upcoming three-match ODI series against Bangladesh due to a hand injury, Shami is doubtful for Tests also: Sources
(File photo) pic.twitter.com/ddF8C9WGfv
— ANI (@ANI) December 3, 2022
मोहम्मद शमीला संघातून बाहेर पडाव लागल्यामुळं त्याच्याऐवजी (umran malik) उमरान मलिक याला संघात स्थान मिळालं आहे. (new zealand) न्यूझीलंड दौऱ्यावर त्यानं टीम इंडियामधून क्रिकेट जगतात पदार्पण केलं होतं. तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये उमराननं तीन विकेट्सही आपल्या नावे केले. तेव्हा आता बांग्लादेशमध्ये त्याची कामगिरी कशी असणार, याकडेच सर्वांचं लक्ष असणार आहे.
दरम्यान, एकदिवसीय मालिकेनंतर भारतीय संघ बांग्लादेशसोबत (test series) कसोटी मालिकाही खेळणार आहे. शमीचं नाव या संघातही होतं. पण, आता दुखापतीचं गांभीर्य पाहता तो कसोटी मालिकेसाठीच्या संघातही असेल की नाही, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
शमी दुखापतग्रस्त असल्यामुळं भारतीय संघाची संकटं वाढताना दिसत आहेत. दुखापतीमुळं शमीआधी जसप्रीत बुमराहसुद्धा संघाबाहेर आहे. किंबहुना टी20 वर्ल्ड कपमध्येसुद्धा त्याचा सहभाग दिसून आला नव्हता. भरीस भर म्हणजे ऑलराऊंडर रविंद्र जडेजासुद्धा दुखापतीमुळं एकदिवसीय मालिकेतून संघाबाहेर आहे. त्यामुळं गोलंदाजीच्या बाबतीत संघाची हीच पडली बाजू संकटं वाढताना दिसत आहे.