मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील टी-20 मालिका 7 जुलैपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाचीही घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली या 31 वर्षीय खेळाडूसा संघात संधी मिळणार आहे.
युवा टीम इंडिया नुकतीच आयर्लंड दौऱ्यावरून थेट इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. या मालिकेत आयर्लंडमध्ये खेळणाऱ्या अनेक खेळाडूंनाही संधी मिळालीय. या यादीत राहुल त्रिपाठीच्या नावाचाही समावेश आहे.
2017 पासून राहुल त्रिपाठी आयपीएलचा भाग आहे. तो 31 वर्षांचा आहे, मात्र त्याने टीम इंडियासाठी अद्याप एकही सामना खेळलेला नाही. आयपीएल 2022 मधील त्याची कामगिरी खूप चांगली होती, त्यामुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
राहुल त्रिपाठीचं कौशल्य
राहुल त्रिपाठी सलामीवीर म्हणून आणि खालच्या फळीतही फलंदाजी करू शकतो. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे त्याला टीम इंडियासाठी पदार्पणाची एकच संधी मिळणार आहे. हा दौरा त्याच्यासाठी खूप खास आणि महत्त्वाचा असणार आहे.
आयपीएल कामगिरी
राहुल त्रिपाठीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 76 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 1798 धावा आहेत. आयपीएल 2022 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना त्याने 14 सामन्यांमध्ये 414 धावा केल्या होत्या. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे.
टी20 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, दिनेश कार्तिक, व्यंकटेश अय्यर, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग मलिक, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान.