नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात भारताच्या फिल्डिंगमध्ये खूप सुधार पाहायला मिळत आहे. खासकरुन फिल्डिंगसाठी कमजोर समजले जाणारे फिल्डरही सुपरमॅन सिद्ध होतायत.
भारत आणि साऊथ आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी २० सामन्यात असाच एक कारनामा पाहायला मिळाला.
जसप्रीत बुमराहने घेतलेला कॅच डोळ्याचं पारणं फेडणारा होता.
सातवी ओवर सुरू होती. हार्दिक पांड्याचा त्या ओव्हरचा पहिलाच बॉल डेविड मिलरने उंच टोलावला.
सीमारेषेपर्यंत हा बॉल हवेत उंच गेला. बॉल बॉऊंड्री लाईन पार करणारच होता, तेवढ्यात बुमराह तिथे आला. त्याने आकाशात उडी मारली. बॉल कंट्रोलमध्ये आणला आणि बॉल बाऊंड्री बाहेर जाण्याआधी आत फेकला.
सर्वांना वाटलं सिक्स वाचला. पण अम्पायरने थर्ड अम्पायरला विचारून याला सिक्स दिला. बुमराहने जेव्हा बॉल फेकला तेव्हा तो बॉन्ड्री लाईनला टच नव्हता. मग अस का झालं ?
जेव्हा बुमराहने उडी मारली तेव्हा बाऊंड्रीच्या भागावर त्याचा पाय होता. मैदानात कॅच घेण्याआधीचा शेवटचा क्षण बॉऊंड्री लाईनवर होता. नियमानुसार हा सिक्स झाला.
असो. सिक्स दिला असला तरीही बुमराहचा प्रयत्न अद्भुत होता. हा कॅच पुन्हा पुन्हा पाहण्यात येतोय. मिलरच काय ? तो तर २ बॉल्सनंतर आऊट झाला.