मुंबई : IPL 2022 चे अवघे दोन सामने उरले आहेत, यानंतर लगेचच टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या मालिकेसाठी बीसीसीआयने आधीच टीम इंडियाची घोषणा केली आहे. आता कर्णधार केएल राहुल कोणत्या 11 खेळाडूंना टी-20 मालिकेत खेळण्याची संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सलामीची जोड़ी
भारताचा ओपनिग फलंदाज केएल राहुल असणारचं आहे, त्याच्या जोडीला इशान किशन असू शकतो. इशानच्या जागी ऋतुराज गायकवाडही संघात आहे, पण डाव्या-उजव्या जोडीनुसार इशानला संधी मिळण्याची खात्री आहे.
विराट कोहलीही या मालिकेत खेळत नसल्याने तिसऱ्या क्रमांकावर कोणत्या खेळाडूला स्थान मिळते हे पाहणे विशेष ठरणार आहे. तसे, तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याचा सर्वात मोठा दावेदार श्रेयस अय्यर असेल. हार्दिक पांड्या चौथ्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ऋषभ पंत पाचव्या क्रमांकावर उतरू शकतो. तर दिनेश कार्तिक सहाव्या क्रमांकावर उतरू शकतो. कार्तिक आयपीएल 2022 चा सर्वोत्कृष्ट फिनिशर म्हणून उदयास आला आहे. आगामी T20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून एक गोष्ट स्पष्ट आहे की, कार्तिकच्या खेळाकडे खूप लक्ष दिले जाणार आहे.
गोलंदाजांमध्ये कोणाला संधी ?
कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल ही सुपरहिट जोडी दक्षिण आफ्रिका मालिकेत पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. दोन्ही गोलंदाजांनी आयपीएल 2022 मध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. त्याचबरोबर हर्षल पटेल आणि उमरान मलिक हे संघाचे दोन वेगवान गोलंदाज असू शकतात. गरज भासल्यास हार्दिक पांड्याही वेगवान गोलंदाजी करू शकतो.
टीम इंडिया: केएल राहुल (कप्तान), ऋतुराज गायकवाड़, ईशान किशन, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, वेंकटेश अय्यर, युजवेंद चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवि बिश्नोई , भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक