मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा कसोटी सामना बंगळुरूमध्ये खेळवला जात आहे. पहिला कसोटी सामना टीम इंडियाने एका डावात जिंकला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात ही गती थोडी धीमी आली आहे. मात्र टीम इंडियाचे खेळाडू उत्तम कामगिरी करत आहेत.
आतापर्यंत कसोटी सामन्यातील 2 दिवस पूर्ण झाले आहेत. तप टीम इंडिया विजयाच्या 9 विकेट्स दूर आहे. टीम इंडियाचे खेळाडू या सीरिजमध्ये दमदार कामगिरी करताना दिसले. रोहित शर्मा, रिषभ पंतने अनोखे विक्रम केले आहेत. त्याच सोबत आता हिटमॅनच्या टीममधील आणखी एका धडाकेबाज फलंदाजाने अनोखा विक्रम रचला आहे.
भारतीय खेळाडूनं रचला इतिहास
श्रीलंके विरुद्धच्या पिंक बॉल कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूनं हा विक्रम रचला आहे. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावात 0टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरने 98 बॉलमध्ये 92 धावा केल्या. त्याच्या या धुरंधर खेळीचा टीम इंडियाला मोठा फायदा झाला.
दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यरची बॅट थांबली नाही. त्याने आपल्या धडाकेबाज फलंदाजीनं धावांचा पाऊस पाडला. त्याने दुसऱ्या डावात 87 बॉलमध्ये 67 धावा केल्या. या सामन्यात दोन अर्धशतकं झळकवली, यासोबतच अय्यरने असा विक्रम केलाय जो यापूर्वी कोणत्याही भारतीय खेळाडूच्या नावावर नव्हता.
डे-नाईट कसोटीच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा श्रेयस अय्यर हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला. पिंक बॉल कसोटीच्या दोन्ही डावात 50 हून अधिक धावा करणारा तो चौथा फलंदाज ठरला आहे.
पिंक बॉल कसोटी सामन्यातील विक्रम करणाऱ्या खेळूंची नावं
पिंक बॉल कसोटी सामन्याच्या 2016 मध्ये ड्वेन ब्रावो दोन्ही डावात अर्धशतक ठोकणारा जगातील पहिला खेळाडू ठरला. ब्रावोने पाकिस्तान विरुद्धच्या डे नाईट कसोटी सामन्यात हा विक्रम रचला होता. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू स्टीव स्मिथ आहे. तिसऱ्या स्थानावर मार्नस लाबुशेन आहे. या यादीमध्ये आता चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरचं नाव जोडलं गेलं आहे. हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
श्रेयस अय्यरने 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं हा विक्रम रचला आहे. पिंक बॉल टेस्ट मध्ये पहिल्या डावात सर्वाधिक षटकार ठोकरणारा श्रेयस अय्यर जगातील पहिला खेळाडू ठरला. त्याचा नावावर हा विक्रमही नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या नाथन लियोनने 3 षटकार ठोकले होते. त्यानंतर हा विक्रम आजवर कोणी मोडला नव्हता पण अय्यरने हा विक्रम श्रीलंके विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात मोडला आहे.